सई ताम्हणकर-सिद्धार्थच्या चित्रपटाचे गाणं प्रदर्शित (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : “श्रीदेवी प्रसन्न”मधून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ यांच्या फिल्मसाठी लोक किती उत्सुक आहेत ते सिद्ध केलं आहेच. (Movie Sridevi Prasanna) येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Movie Sridevi … The post सई ताम्हणकर-सिद्धार्थच्या चित्रपटाचे गाणं प्रदर्शित (Video) appeared first on पुढारी.

सई ताम्हणकर-सिद्धार्थच्या चित्रपटाचे गाणं प्रदर्शित (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : “श्रीदेवी प्रसन्न”मधून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ यांच्या फिल्मसाठी लोक किती उत्सुक आहेत ते सिद्ध केलं आहेच. (Movie Sridevi Prasanna) येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Movie Sridevi Prasanna)
संबंधित बातम्या –

Ram Mandir-Anushka Sharma : व्हायरल झालेल्या फोटोत अनुष्का? काय म्हणतात नेटकरी…

Fighter : रिलीज आधी ‘फायटर’ची ॲडव्हान्स बुकिंग, १ कोटींची तिकिट्स विक्री

Ram Mandir-Jackie Shroff : ‘भक्ती में ही शक्ती है..’ अयोध्येहून जॅकीने अनवाणी आणली रामलल्लाची मूर्ती (video)

“श्रीदेवी प्रसन्न या फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा यांच्या सारख्या मातब्बर कलाकारांसोबत सिनेमात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे तरुण कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. सुलभा आर्या या सईच्या फिल्मी आज्जीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाचा डिजिटली ट्रेलर प्रदर्शित
ट्रेलरमध्ये सिद्धार्थ व सईची जोडी धम्माल करताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच श्रीदेवी ही चित्रपट वेड्या, फिल्मी म्हणाव्या अशा कुटुंबातील मुलगी, त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही श्रीदेवीच्या नावाप्रमाणेचं अगदी फिल्मी अशी असतात, अशा कुटुंबात वाढलेली श्रीदेवी, तिच्या कुटुंबातील सदस्यांचाही लव मॅरेज या संकल्पनेवर दांडगा विश्वास त्यामुळे त्यांना अरेंज मॅरेजचे वावडे ,तर एका सर्वसामान्य घरातील मुलगा प्रसन्न, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा मुलगा वयात आला की त्याच वेळेत लग्न होणे ते लग्न न केल्यामुळे मुलगा वाया जातो की काय अशी घरातल्यांची एकंदरीतच भीती त्यामुळे वयात आलेल्या प्रसन्नच्या मागे लग्न कर लग्न कर असा ससेमिरा लावणारे त्याचे कुटूंबिय. अशा वेगळ्या कुटुंबातून आलेल्या श्रीदेवी आणि प्रसन्न यांची ओळख मॅट्रिमोनियल साईटवर होते त्यानंतर दोघे एकमेकांना भेटतात व त्यानंतरची भन्नाट धम्माल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
विशाल विमल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)

 

View this post on Instagram

 
A post shared by Tips Marathi (@tips.marathi)

 

View this post on Instagram

 
A post shared by Tips Marathi (@tips.marathi)

Latest Marathi News सई ताम्हणकर-सिद्धार्थच्या चित्रपटाचे गाणं प्रदर्शित (Video) Brought to You By : Bharat Live News Media.