जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली पिंपळनेर नगरी

पिंपळनेर:जि.धुळे; पुढारी वृत्तसेवा अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू औराम प्राणाप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे.या पाश्र्वभूमीवर पिंपळनेर शहरातील प्रत्येक मंडळ,चौक,संस्था,प्रतिष्ठाने,मंदिरे,दुकाने,गल्ली,घर आदी ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या भव्य-दिव्य प्रतिमांसह आकर्षक पताके,भगवे झेंडे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली.यातून पिंपळनेरकरांना दिवाळीची अनुभूती आली आहे. मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करीत औराम भक्तांनी मोठा जल्लोष केला, एकही नारा..एकही नाम… जय श्रीराम,जय … The post जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली पिंपळनेर नगरी appeared first on पुढारी.

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली पिंपळनेर नगरी

पिंपळनेर:जि.धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा
अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू औराम प्राणाप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे.या पाश्र्वभूमीवर पिंपळनेर शहरातील प्रत्येक मंडळ,चौक,संस्था,प्रतिष्ठाने,मंदिरे,दुकाने,गल्ली,घर आदी ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या भव्य-दिव्य प्रतिमांसह आकर्षक पताके,भगवे झेंडे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली.यातून पिंपळनेरकरांना दिवाळीची अनुभूती आली आहे. मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करीत औराम भक्तांनी मोठा जल्लोष केला, एकही नारा..एकही नाम… जय श्रीराम,जय श्रीराम हा नारा देत प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी पिंपळनेर शहर दणाणून सोडले.सकाळपासून रामनगर स्थित श्रीराम मंदिरात सकाळी पूजा,आरती व विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर रामनगर येथून भव्य- दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.
सजीव देखावा ठरला आकर्षक
शोभायात्रेदरम्यान प्रभू श्रीराम,सीता,लक्ष्मण,हनुमान यांचे पात्र असलेला सजीव देखावा सजवलेल्या रथावर सादर करण्यात आला व तो सर्वांसाठी लक्ष वेधून घेणारा ठरला,रथासोबतच प्रभू श्रीराम यांची मूर्ती विराजमान असलेली पालखीदेखील काढण्यात आली.संपूर्ण शोभायात्रेत श्रीराम,हनुमान यांचे पात्र साकारणाऱ्या लहान बालकांनी देखील सहभागी उपस्थितांची मने जिंकून घेतले,तर श्रीराम मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात तब्बल 61 फुटाचा ध्वज उभारण्यात आला असून हा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.या शोभा मात्रेत लहान बालकांसह तरुण,तरुणी, महिला-पुरुष व वृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला व हजारोच्या संख्येने श्री रामभक्त या शोभायात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले.रामभक्तांच्या गर्दीने मोठ्या विक्रमाचा उच्चांक गाठला.
पांझरा नदीवरील पुलावर भगवे झेंडे फडकले
पांझरा नदीवरील पुलाच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले होते.तसेच विविध मंडळांकडून रथाचे, शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.श्रीरामाचा जयघोष करत पिंपळनेरकर बँडच्या तालावर हातात भगवे झेंडे घेऊन व श्रीरामाच्या जयघोषाने नाचण्यात मग्न झाले होते.
शाळांचाही मोठा सहभाग
या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या शोभायात्रेत शहरातील सर्वच शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीत ढोल ताशा,लेझीम नृत्य,वानर सेना,वारकरी आदीच्या माध्यमातून सेवा दिली आहे.सार्वजनिक सुट्टी असली तरी मोठ्या भक्तिभावाने चिमुकले शोभायात्रेत सहभागी झाले होते,तर प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.
पिंपळनेर शहर झाले भगवे
श्रीरामल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य उंचीचे श्री रामांची प्रतिमा असलेले बॅनर शहराच्या चौका-चौकात लावण्यात आले होते.या प्रतिमेतून प्रभू श्रीरामाचे विराट दर्शन होताना दिसले, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने पिंपळनेर नगरी सजली होती.या विशेष सजावटीमुळे संपूर्ण पिंपळनेर शहराचे वातावरण ‘राममय’ झाल्याचे पाहायला मिळाले.
शोभायात्रा सुरळीत
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होत असल्याने श्रीराम भक्तांमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण होते.मिरवणुकीत 70 टक्के महिलांचाच सहभाग ही एक आगळीवेगळी उपलब्धी.25 हजारांपेक्षा पेक्षा जास्त संख्येने जनता असताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.परिणामी हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांकडून जय्यत तयारी सुरू होती,प्रत्येक गावातील प्रत्येक घरात अक्षता वाटपासह, निमंत्रण पत्रिका,गाव निमंत्रण, हनुमान चालिसा पठण,रामरक्षा पठण,विविध भक्ती गीत,भजन,कीर्तन, जनजागृती आदीच्या माध्यमांतून पिंपळनेर शहरात भव्य-दिव्य शोभायात्रा अत्यंत सुरळीतपणे पार पडली.या संपूर्ण शोभायात्रेत पिंपळनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत
शहरातील प्रत्येक मंडळांकडून शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.मिरवणूक मार्गावर रांगोळी,पुष्पवृष्टी,फटाक्याची आतषबाजी,भक्तिगीते इत्यादी माध्यमातून स्वागत झाले तर ठिकठिकाणी पाणी, शरबत,बिस्किट,चॉकलेट, प्रसाद इत्यादी वाटप झाले.
या मार्गाने निघाली शोभायात्रा
श्रीराम मंदिर,टेंभा रोड, हनुमान मंदिर,इंदिरा नगर, सामोडे चौफुली,बस स्थानक, सताना रोड,महावीर भवन, गोपाल नगर,एखंडे गल्ली, मुरलीधर मंदिर,नाना चौक, बाजारपेठ,खोगल्ली,होळी चौक,भोई गल्ली,सुभाषचंद्र बोस चौक,पंचमुखी कॉर्नर, नविन भाजी बाजार,विश्वनाथ चौक,माळी गल्ली व श्रीराम मंदिर या प्रमुख मार्गावरुन शोभायात्रा काढण्यात आली.
महाप्रसादाचे वाटप
शहरातून शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे वाटप शहरातील दमंडकेश्वर लॉन्स येथे करण्यात आले.यावेळी 17हजार भाविकांची महाप्रसादाचा लाभ घेतला.तर सायंकाळी कै.एन.एस.पी. पाटील विद्यालयात ‘श्रीराम संध्या’ हा कार्यक्रम संपन्न झाला.
Latest Marathi News जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली पिंपळनेर नगरी Brought to You By : Bharat Live News Media.