आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देणार: मुख्यमंत्री

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे. कोणच्याही आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. मराठा समाजाने आंदोलनाची वाट न धरता राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२३) पत्रकारांशी बोलताना केले.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबई दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव देखील आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका मांडली.
शिंदे म्हणाले की, राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू केले आहे.
हेही वाचा
सर्वोच्च न्यायालयाची एकनाथ शिंदेंसह त्यांचा सर्व चाळीस आमदारांना नोटीस
World Economic Forum : महाराष्ट्रासाठी मोठी संधी…! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आर्थिक परिषदेसाठी दावोसला रवाना
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना : राहुल नार्वेकर
Latest Marathi News आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देणार: मुख्यमंत्री Brought to You By : Bharat Live News Media.
