वाशिम : देशी कट्टयातून गोळीबार; युवक गंभीर जखमी

वाशिम ; पुढारी वृत्‍तसेवा वाशिम शहरातील मन्नासिंह चौकात घरगुती वादातुन एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. शिवम उर्फ सनी ठाकुर असे या गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिमच्या मन्नासिंह चौकात घरगुती वादातून हा गोळीबार झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या … The post वाशिम : देशी कट्टयातून गोळीबार; युवक गंभीर जखमी appeared first on पुढारी.

वाशिम : देशी कट्टयातून गोळीबार; युवक गंभीर जखमी

वाशिम ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा वाशिम शहरातील मन्नासिंह चौकात घरगुती वादातुन एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. शिवम उर्फ सनी ठाकुर असे या गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिमच्या मन्नासिंह चौकात घरगुती वादातून हा गोळीबार झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.
या घटनेत माजी नगर परिषद उपाध्यक्ष भानु प्रतापसिंग ठाकूर यांचा मुलगा शिवम उर्फ सनी ठाकुर याच्या पायाला मांडीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. गोळी झाडणाऱ्या संशयीत आरोपीचे नाव संग्राम उर्फ बिट्टू ठाकुर असे आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात बिट्टू ठाकुरसह विश्वजीत ठाकुर, वाठोरे, खडसे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील सर्व संशयीत आरोपी सध्या फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास वाशीम शहर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मात्र वाशिम शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : 

चार हजार चपात्या.. तर 50 किलो चटणी ; आंदोलनकर्त्यांसाठी सरसावले अनेक हात 
शिवसेना पळवणाऱ्या वालीचा वध करणार : उद्धव ठाकरे 
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर केली ‘आजोबां’सोबतची आठवण  

Latest Marathi News वाशिम : देशी कट्टयातून गोळीबार; युवक गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.