मराठा समाज पदयात्रेनिमित्त वाहतुकीत बदल : उपायुक्त विवेक पाटील यांचे आदेश

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढली आहे. बुधवारी (दि. 24) पदयात्रा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. असा असेल पदयात्रेचा मार्ग जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली … The post मराठा समाज पदयात्रेनिमित्त वाहतुकीत बदल : उपायुक्त विवेक पाटील यांचे आदेश appeared first on पुढारी.

मराठा समाज पदयात्रेनिमित्त वाहतुकीत बदल : उपायुक्त विवेक पाटील यांचे आदेश

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढली आहे. बुधवारी (दि. 24) पदयात्रा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
असा असेल पदयात्रेचा मार्ग
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली पदयात्रा जगताप डेअरीमार्गे शहरात दाखल होणार आहे. त्यानंतर डांगे चौक – बिर्ला हॉस्पीटल- चाफेकर चौक- अहिंसा चौक- महावीर चौक – खंडोबामाळ चौक- टिळक चौक – भक्ती-शक्ती – पूना गेट – देहूरोड- तळेगावमार्गे मुंबईच्या दिशेने जाणार आहे.
असे आहेत बदल सांगवी वाहतूक विभाग
औंध येथील डी-मार्टकडून सर्व प्रकारच्या वहनांना सांगवी फाट्याकडे येण्यास प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने पोल चौक येथून डावीकडे नागराज रोडमार्गे इच्छित स्थळी जातील. पिंपळे निलेखकडून येणारी सर्व प्रकारची वाहने रक्षक चौकाकडे न येता विशालनगर डीपी रोडने जगताप चौक – कस्पटे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील जगताप डेअरी ब्रीजखालील चौकामध्ये कस्पटे चौकाकडून येणारी सर्व प्रकारची वाहने डाव्या व उजव्या बाजूने औंध रावेत रोडला न येता सरळ ग्रेड सेपरेटरमधून शिवार चौक, कोकणे चौकाकडून इच्छित स्थळी जातील. – शिवार चौकाकडून येणारी वाहतूक उजव्या आणि डाव्या बाजूने औंध रावेत रोडला न येता सरळ ग्रेड सेपरेटरमधून कस्पटे चौकातून इच्छित स्थळी जातील.
तापकीर चौक, एमएम चौकाकडून काळेवाडी फाटा ब्रीजकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. सदर मार्गावरील वाहने रहाटणी फाटा चौकातून रहाटणीगाव गोडांबे चौकाकडून इच्छित स्थळी जातील. सांगवी गावातून सांगवी फाट्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शितोळे पंप, वसंतदादा पुतळा चौक, दापोडी मार्गे इच्छितस्थळी जातील.
वाकड वाहतूक विभाग
ताथवडे गांव चौकाकडून डांगे चौकाकडे येणारी वाहने ताथवडे चौकामधून उजवीकडेवळून ताथवडे अंडरपास किंवा परत हँगिंग ब्रीजमार्गे इच्छित स्थळी जातील. काळाखडक येथून डांगे चौकाकडे जाणारी वाहने काळाखडक येथून युटर्न घेऊन भूमकर चौक मार्गे इच्छितस्थळी जातील दत्तमंदिर रोड, वाकड येथून डांगे चौकाकडे येणारी वाहने अण्णा भाऊ साठे चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील. छत्रपती चौक, कसप्टेवस्ती येथून काळेवाडी फाट्याकडे येणारी वाहने छत्रपती चौक येथून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील. बारणे कॉर्नर, थेरगाव येथून थेरगांव फाट्याकडे येणारी वाहने उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील, अथवा यू टर्न घेऊन तापकिर चौकाकडे जातील.
थेरगावकडून बिर्ला हॉस्पीटल चौकाकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने राघवेंद्र महाराज मठ येथून इच्छित स्थळी जातील किंवा बारणे कॉर्नर थेरगाव मार्गे इच्छित स्थळी जातील. कावेरीनगर पोलीस वसाहतीकडून येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना कावेरीनगर अंडरपासकडे जाण्यास प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने वाकड भाजीमंडई समोरील कॉर्नर येथून डावीकडे वाकड पोलीस स्टेशनकडील रस्त्याने दत्त मंदिर रोडने इच्छित स्थळी जातील.
चिंचवड वाहतूक विभाग
दळवीनगर चौकाकडुन खंडोबामाळ आणि चिंचवड स्टेशनकडे जाणारा रोड सर्व वाहनासाठी बंद. या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने इच्छीतस्थळी जातील. रिव्हर व्हीव चौकातुन डांगे चौक तसेच डांगे चौकाकडून महावीर चौकाकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने चिंचवडे फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी, रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच, भोसरीकडे जाणारी वाहने बिजलीनगर वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
चिंचवडेनगर टी जंक्शनकडे रिव्हर व्हीवकडुन जाणारी वाहने सरळ रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील. लोकमान्य हॉस्पीटल चौक, चिंचवड समोरील रोडवरून महाविर चौक, चिंचवडकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद. या मार्गावरील वाहने लोकमान्य हॉस्पीटल चौकापासुन डावीकडे वळून दळवीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील. एसकेएफ चौक, चिंचवड मार्गाने खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने इच्छित स्थळी जातील.
लिंकरोड पिंपरीकडून येणारी वाहने चाफेकर चौकात न येता मोरया हॉस्पीटल चौक, केशवनगर मागें इच्छित स्थळी जातील.
महाविर चौक, शिवाजी चौकात येणार्‍या वाहनांना प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने मोहनगर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
बिजलीनगर चौक, त्रिवेणी हॉस्पीटल चौकाकडून रिव्हर व्हीव चौकाकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. या मार्गावरील वाहतूक रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील. मुकाई चौकाकडून चिंचवडकडे येणारी वाहतूक त्रिवेणी हॉस्पीटल, वाल्हेकरवाडी येथे डावीकडे वळून पार्श्व चौक, भेळचौक मार्गे पुढे काचघर चौकातून डावीकडे वळून युटर्न घेवून भक्ती-शक्ती चौकातील भुयारी मार्गातुन अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
पिंपरी वाहतूक विभाग
निरामय हॉस्पीटलकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक सरळ आणि उजवीकडे न जाता डाव्या बाजुकडे वळून मोरवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल. परशुराम चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. या मार्गावरील वाहतूक थरमॅक्स चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल. केएसबी चौकाकडून महावीर चौक तसेच छत्रपती शिवाजी चौकात येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने बसवेश्वर चौक येथून डावीकडे वळून अ‍ॅटो क्लटर मार्गे इच्छित स्थळी जातील.
निगडी वाहतूक विभाग
थरमॅक्स चौकाकडुन येणारी वाहतुक ही आर.डी. आगा मार्गाकडुन गरवारे कपंनी पर्यंत येऊन तेथील टी जॅक्शनवरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता डावीकडुन परशुराम चौकाकडुन मोहननगर, चिचंवडमार्गे इच्छित स्थळी जातील. दळवीनगर पुलाकडून, आकुर्डी गावठाणातून येणारी वाहतूक खंडोबामाळ चौकाकडे न येता गणेश व्हिजनमार्गे आकुर्डी गावठाणमार्गे इच्छित स्थळी जातील. दुर्गा चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता थरमॅक्स चौकाकडे किंवा यमुनानगरमार्गे इच्छित स्थळी जातील. भेळ चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता सावली हॉटेलमार्गे इच्छित स्थळी जातील.
अप्पुघर/रावेतकडून येणारी वाहतूक आणि ट्रान्सपोर्टनगरमधून येणारी वाहतूक ही भक्ती-शक्ती उड्डाण पुलावर न चढता भक्ती-शक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) अंकुश चौक, त्रिवेणीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील. त्रिवेणीनगर अंकुश चौक आणि भक्ती-शक्तीकडून देहुरोडकडे जाणारी वाहतूक भक्ती-शक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) सरळ अप्पूघर रावेतमार्गे देहुरोड मुंबईकडे जाईल. देहूरोडकडून येणारी वाहतुक भक्ती-शक्ती सर्कलवरुन त्रिवेणीनगर चौकाकडे वळवतील किंवा हॉटेल समोरुन भक्ती-शक्ती उड्डाण पुलावरून सरळ ग्रेडसेपरेटरमधून इच्छित स्थळी जातील. भक्ती-शक्तीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक हँगिंग ब्रीजमार्गे इच्छित स्थळी जातील.
भोसरी वाहतूक विभाग
पुणे, खडकी, दापोडी, फुगेवाडी बाजूकडून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकाकडे न जाता नाशिक फाट्यावरुन मोशी चौक किंवा कस्पटे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. चाकण, मोशी, आळंदी बाजूकडून नाशिक फाटामार्गे मुंबई बाजूकडे जाणारी वाहने पांजरपोळ जंक्शनवरुन स्पाईन रोडने त्रिवेणीनगर, भक्ती-शक्ती अंडरपासमधून रावेतमार्गे इच्छित स्थळी जातील किंवा नाशिक फाटा कस्पटे चौक, वाकड नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
देहुरोड वाहतूक विभाग
तळवडेकडुन देहुकमान जुना मुंबई कडे येणारी वाहतूक पूर्ण बंद करून देहुगाव मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन येणारी वाहतूक सोमाटणे एक्सिट, देहुरोड एक्सिट पूर्णपणे बंद करून बंगळूर हायवेने इच्छित स्थळी जातील. बंगळूर हायवेने मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक किवळे ब्रीजकडून जुन्या हायवेने येण्यास पुर्णपणे बंदी. जड अवजड तसेच छोटी वाहने एक्स्प्रेस हायवेने इच्छित स्थळी जातील. तसेच, दुचाकी किवळे छेद रस्त्यातून कृष्णा चौक, लोढा स्किम, गहुंजे गावमार्गे इच्छित स्थळी जातील, मुंबईकडुन पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक सेंट्रल चौकातून बंगळूर हायवेने इच्छित स्थळी जातील. पदयात्रा जुन्या हायवेने जाणार असल्याने भक्ती-शक्ती चौक येथे आल्यानंतर वडगाव चौकातून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
तळेगाव वाहतूक विभाग
तळेगाव-चाकण रोडवरून मुंबईचे दिशेने जाणारी जड, अवजड वाहतुकीस प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने महाळुंगे वाहतूक विभागातील एचपी चौकमार्गे इच्छित स्थळी जातील. तळेगाव गावठाणकडून लिंब फाट्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक सरळ आणि उजवीकडे न जाता डाव्या बाजूने इच्छित स्थळी जातील. बेलाडोरमार्गे एबीसी पेट्रोलपंप चौकात येणारी सर्व प्रकारची वाहतूक सरळ, उजवीकडे न जाता डाव्या बाजूने इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा

नाशिकमध्ये ३१५ उमेदवारांनी दिली एमपीएससी मेन्स
अंगणवाडी सेविका आंदोलन : आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी
चाकण-तळेगाव रस्त्यावर अपघात; दोघे युवक ठार

Latest Marathi News मराठा समाज पदयात्रेनिमित्त वाहतुकीत बदल : उपायुक्त विवेक पाटील यांचे आदेश Brought to You By : Bharat Live News Media.