यवतमाळ: तरुणीला जत्रेला घेऊन गेलेला भोंदूबाबा परतलाच नाही

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : एका तरुणीला डोकेदुखीच्या असह्य वेदना होत होत्या. खूप दवाखाने केले, पण डोकेदुखी थांबली नाही. एकाने महाराजांकडे उपचार घेण्याचे सुचविले. त्यानुसार महाराजाला गाठण्यात आले. पण तो विश्वासघातकी निघाला. २२ वर्षीय मुलीला जैत्रेला नेत असल्याचे सांगून सोबत नेले. पण परतलाच नाही. अखेर पोलिसांत तक्रार केली. भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Yavatmal … The post यवतमाळ: तरुणीला जत्रेला घेऊन गेलेला भोंदूबाबा परतलाच नाही appeared first on पुढारी.

यवतमाळ: तरुणीला जत्रेला घेऊन गेलेला भोंदूबाबा परतलाच नाही

यवतमाळ : Bharat Live News Media वृत्तसेवा : एका तरुणीला डोकेदुखीच्या असह्य वेदना होत होत्या. खूप दवाखाने केले, पण डोकेदुखी थांबली नाही. एकाने महाराजांकडे उपचार घेण्याचे सुचविले. त्यानुसार महाराजाला गाठण्यात आले. पण तो विश्वासघातकी निघाला. २२ वर्षीय मुलीला जैत्रेला नेत असल्याचे सांगून सोबत नेले. पण परतलाच नाही. अखेर पोलिसांत तक्रार केली. भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Yavatmal News
नेर तालुक्याच्या एका गावातील कुटुंबासोबत हा प्रकार घडला. या कुटुंबातील २२ वर्षीय युवती व तिच्या बहिणीला डोकेदुखीचा त्रास होता. गावातील एका तरुणाने त्यांना कोहळा पुनर्वसन (सावरगाव काळे) येथील प्रकाश जनार्दन नाईक (वय ५०) या भोंदूबाबाकडे नेण्याच सल्ला दिला. प्रकाश महाराज घरगुती व मांत्रिक पद्धतीने उपचार करतात. त्याच्या उपचाराने अनेक रोगी बरे झाल्याची पुष्टीही जोडली. Yavatmal News
त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीला भोंदू बाबाकडे नेले. त्यानंतर युवतीच्या कुटुंबासोबत भोंदू बाबाने घरोबा वाढविला. मुलीचे वडील व भोंदूबाबा लाखनवाडी (जि. अमरावती) येथे जत्रेलाही जाऊन आले. त्यानंतर बाबाने उपचार सुरू असलेल्या २२ वर्षीय युतीवर प्रेमाचा पाश आवळला. १० जानेवारीच्या रात्री १२ वाजता बाबा चारचाकीने युवतीच्या घरी आला. उपचार सुरू असलेल्या मुलीला लाखनवाडी येथे जत्रेला घेऊन जात असल्याचे त्यांने सांगून मुलीला सोबत नेले. ११ जानेवारीपासून बाबाचा फोन बंद झाला. या प्रकरणी प्रकाश महाराज नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा 

यवतमाळमध्ये बनावट सही व शिक्का वापरून २० लाखांचा अपहार
यवतमाळ : ३८ विद्यार्थ्यांना अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून मिळाले ३९ लाख
यवतमाळ: मालवाहू अ‍ॅपे पुलावरून कोसळला; 6 जणांचा मृत्यू

Latest Marathi News यवतमाळ: तरुणीला जत्रेला घेऊन गेलेला भोंदूबाबा परतलाच नाही Brought to You By : Bharat Live News Media.