Pune : इंदापुरातील कृषी महोत्सवाची जय्यत तयारी

इंदापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरच्या वतीने इंदापूर कृषी महोत्सव 2024 अंतर्गत दि. 24 ते 28 जानेवारीदरम्यान पाच दिवसीय कृषी, पशु-पक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शन व डॉग शो तसेच घोडे बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. बाजार समितीस्थळी याची जय्यत तयारी सुरू आहे. बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहित मोहोळकर, आमदार तथा संचालक यशवंत माने, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी सोमवारी (दि. 22) रोजी तयारीचा आढावा घेत कामाची पाहणी केली. बाजार समिती आवारामध्ये स्टॉलची उभारणी करण्यात येत असून घोडेबाजारस्थळी येणार्या व्यापार्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. घोडेबाजारात शेकडो घोडे दाखल झाले असून आणखी घोडे येणार आहेत.
इंदापूर कृषी महोत्सव 2024 अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती अवजारे-साधने, ऑटोमोबाईल, गृहपयोगी आवश्यक वस्तू तसेच शेती, कृषी अनुषंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे 250 स्टॉल व 50 खाद्य स्टॉल असणार आहेत. पशु-पक्षी, जनावरे प्रदर्शन व घोडेबाजार प्रदर्शनाच्या ठिकाणीच असणार आहे.
Latest Marathi News Pune : इंदापुरातील कृषी महोत्सवाची जय्यत तयारी Brought to You By : Bharat Live News Media.
