चाकण-तळेगाव रस्त्यावर अपघात; दोघे युवक ठार
चाकण : Bharat Live News Media वृत्तसेवा : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 21) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर घडला. याप्रकरणी अनिल शंकर परदेशी (वय 33, रा. महाळुंगे) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामसिंग परदेशी (वय 27) व रिंकू शारदा सिंग (वय 20, दोघे रा. महाळुंगे) अशी अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. फिर्यादी यांचा चुलत भाऊ गणेश हा त्याचा मित्र रिंकू याच्यासह दुचाकीवरून चाकण-तळेगाव रस्त्याने जात होता. या वेळी सुधा पुलाजवळ ते आले असता पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरात धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील दोघे खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना इतरांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले; मात्र दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या वेळी धडक देणारा वाहनचालक तेथे न थांबता तेथून पसार झाला. अपघातस्थळ महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीजवळ तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत असल्याने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
Shiv Sena News : शिवसेनेचे वाघ नसते, तर काल रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- संजय राऊत
India stock market | भारत बनला जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार, हाँगकाँगला मागे टाकले
Latest Marathi News चाकण-तळेगाव रस्त्यावर अपघात; दोघे युवक ठार Brought to You By : Bharat Live News Media.