Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तिला आपण रानातली पारवळ म्हणू शकतो, मोराचं सतरंगी मोरपीस म्हणू शकतो, किंवा डोंगरातल्या वाहणाऱ्या झऱ्याचा मंजुळ नाद पण म्हणू शकतो. पारू काय नाही? तर पारू हे सगळं आहे. पारू खरंतर एक जग आहे. (New Marathi TV Serial ) निरागस प्रेमाने भरलेली, उत्साहाने सळसळणारी, बारमाही वाहणाऱ्या नदीप्रमाणे खळखळत हसणारी, तुमच्या आमच्या प्रत्येकात दडलेली पारू. झी मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय एक नवा कार्यक्रम-“पारू” (New Marathi TV Serial )
संबंधित बातम्या –
Nora Fatehi ‘Deepfake’ Video : नोराही डीपफेकची बळी!
Ram Mandir Pran Prathistha : अयोध्येत बिग बी, सचिन तेंडुलकरसह दिग्गज सेलिब्रिटी दाखल, कोण कोण ते पाहा (Videos)
हनुमान गढी मंदिरात कंगनाकडून स्वच्छता
ही गोष्ट आहे, गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या पारूची. कित्येक वर्ष आपल्या वडिलांपासून लांब राहिल्यानंतर आता वडिलांच्या सोबत राहायला शहरात आलेली पारू. गावावरून शहरात येताना पारू आपल्यासोबत गावाकडचा निरागसपणा घेऊन आलीये. ती तिच्याबरोबर तिचा निसर्ग घेऊन आलीये. शहराच्या वेगाची जाणीव नसणारी, इथल्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज नसलेली, जे मनात आहेत ते ओठांवर असणारी पारू. या शहराचा वेग तिला पकडता येईल का? इथल्या माणसांच्या मनाचा तिला ठाव घेता येईल का? तिच्या हळव्या मनाला समजून घेणारं, तिच्या हक्काचं कुणीतरी तिला या शहरात भेटेला का? हे सगळं आपल्याला या नवीन मालिकेत बघायला मिळेल.
Latest Marathi News निरागस प्रेमाने भरलेली ‘पारू’ मालिका लवकरच भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.