शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभू श्रीरामाशी आमचं जुनं नातं. शिवसेनेच्या शौर्यामुळे रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. शिवसेनेचे वाघ नसते तर काल रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य होती, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते आज नाशकात सुरू असलेल्या शिवसेनेच्या महाशिबिरात बोलत होते. (Shiv Sena News) Shiv Sena News : दिल्लीतील रावणशाहीसमोर झुकणार नाही- राऊत पुढे … The post शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत appeared first on पुढारी.

शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : प्रभू श्रीरामाशी आमचं जुनं नातं. शिवसेनेच्या शौर्यामुळे रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. शिवसेनेचे वाघ नसते तर काल रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य होती, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते आज नाशकात सुरू असलेल्या शिवसेनेच्या महाशिबिरात बोलत होते. (Shiv Sena News)
Shiv Sena News : दिल्लीतील रावणशाहीसमोर झुकणार नाही- राऊत
पुढे बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना नसती, तर काल रामाची प्राणपतिष्ठा झाली नसती. संपूर्ण देशाचं वातावरण राममय झाले आहे. याच वातावणात उद्धव ठाकरेंनी महाशिबीराची ज्योत पेटवली आहे. त्यामुळे आजपासून आपण कुरूक्षेत्राची लढाई सुरू करणार असून, दिल्लीतील रावणशाहीसमोर आम्ही झुकणार नाही असा इशारादेखील त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारला दिला आहे. (Shiv Sena News
उद्धव ठाकरे हे संयमी योद्धा
रामाचे जे धैर्य आहे ते शिवसेनेचे धैर्य आहे. जे रामाचे शौर्य आहे तेच शिवसेनेचे शौर्य आहे आणि रामाकडे जसा संयम आहे तसाच संयम उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे हे संयमी योद्धा आहेत, असा उल्लेखदेखील राऊत यांनी केले आहे. (Shiv Sena News)

शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन २०२४ । नाशिक – #LIVE https://t.co/3tFaQmDKN0
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 23, 2024

वेट अॅन्ड वॉच आपली पण वेळ येईल
रामायण सर्वाधिक संघर्ष हा नाशकच्या पंचवटीत झाला. रामायण नाशकात अधिक घडलं. शिवसेनेचा संघर्ष हा रामाच्या संघर्षात आहे. संघर्षातून गेल्यावरच दैवत्व प्राप्त होते. रामाचं धैर्य असत्याविरोधात पुकारलेलं होतं. शिवसेनेचा आत्मा हा रामकथेक आहे. रावण अजिंक्य नव्हता, आत्ताचाही नाही. त्यामुळे वेट अॅन्ड वॉच आपली पण वेळ येईल, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
आपण हनुमान आहोत, हे लक्षात ठेवा
राम केवळ देव नाही तर तो नेता देखील होता. कोण मोदी?, कोण फडणवीस?, कोण अजित पवार माहित नाही पण आपण हनुमान आहोत, हे लक्षात ठेवा. हनुमानाच्यात उत्तम लिडरशीप क्वॉलिटी होती, असा उल्लेख देखील राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
हेही वाचा:

Nashik News I नाशिकमध्येही रावण….. खासदार राऊत
आंबेडकरवाद्यांनी इतरांना सामावून घेतले पाहिजे : डॉ. सुनीलकुमार लवटे
शनिवारवाडा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर : इतिहास अभ्यासक मोहन शेटे

 
Latest Marathi News शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत Brought to You By : Bharat Live News Media.