Groww app डाऊन! मोठा फटका बसल्याच्या यूजर्संच्या तक्रारी
Bharat Live News Media ऑनलाईन : ऑनलाइन फायनान्सियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म Groww app आज मंगळवारी डाऊन झाले. यामुळे यूजर्संना इंट्राडे ट्रेडसाठी लॉग इन करताना अॅपला अनेक समस्या आल्या. याबाबतच्या तक्रारी यूजर्संनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत नोंदवल्या.
“आज, मार्केट उघडले पण माझे Groww ॲप उघडले नाही. माझी वॉचलिस्ट दोन दिवसांपूर्वी उघडली नव्हती. माझ्या ओपन पोझिशन्सची मुदत संपणार आहे. आता माझे नुकसान कोण भरेल,” असे एका यूजर्सने X वर म्हटले आहे.
दुसर्या एका यूजर्सने म्हटले, “Groww app @_groww काम करत नाही. अनेकवेळा प्रयत्न केला. फ्लाइट मोड केला आणि नंतर चालू केले तरीही काम करत नाही. त्यांचा प्रोडक्शन सर्व्हर डाउन आहे असे दिसते. कृपया याचे निराकरण करा.”
Today, my grow app is not open since the market opened, my watchlist was not open two days ago, my open positions are about to expire, who will pay my losses? @NSEIndia @NSE_BSE_News @BSEIndia @ZeeBusiness#groww @_groww pic.twitter.com/lLCtOZYCqp
— Dipak kushwaha (@imdipak_k) January 23, 2024
“पीक ट्रेडिंग वेळेत Groww ॲपची ही स्थिती आहे. या नुकसानासाठी कोण जबाबदार असेल?,” असा सवाल एका यूजर्सने केला आहे.
Latest Marathi News Groww app डाऊन! मोठा फटका बसल्याच्या यूजर्संच्या तक्रारी Brought to You By : Bharat Live News Media.