दुर्दैवी : वाघोलीत खाणीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : खाणीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना वाघोली येथील शिवरकरवस्ती परिसरात घडली. अली अहमद शेख (वय 12) आणि कार्तिक दशरथ दुखरे (वय 12, दोघेही रा. वाघोली शिवरकरवस्ती, ता. हवेली) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. सोमवारी (दि. 22) दुपारी ही दुर्घटना घडली. या घटनेबाबत माहिती मिळताच पीएमआडीए अग्निशमन केंद्र वाघोलीच्या जवानांनी व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
एका मुलाला अर्ध्या तासाच्या शोधकार्यानंतर स्थानिकांनी शोधून काढले, तर दुसर्याला अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दोघांंचा मृत्यू झाला होता. पीएमआरडीए वाघोली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील शिवरकरवस्ती परिसरातील खाणीतील पाण्यामध्ये पोहण्यासाठी चार ते पाच मुले गेली होती. मात्र, यातील अली शेख आणि कार्तिक दुखरे यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे दोन्ही मुले पाण्यात बुडत होती. या वेळी इतर मुलांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमले. तसेच 3 वाजून 10 मिनिटांनी वाघोली येथे शिवरकरवस्तीजवळ दोन मुले बुडाल्याची वर्दी पीएमआरडीए अग्निशमन केंद्र वाघोलीला देण्यात आली.
अर्ध्या तासाच्या शोधकार्यानंतर स्थानिकांच्या मदतीने एकाला तर दुसर्या मुलाला अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश ह्रदय हेलावून टाकणारा होता. या शोधकार्यात अग्निशमन अधिकारी विजय महाजन, वाहनचालक अल्ताफ पटेल, ओंकार पाटील व जवान विकास पालवे, महेश पाटील, मयूर गोसावी, प्रशांत चव्हाण, उमेश फाळके, सुरज इंगवले, प्रकाश मदने यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा
Pune News : चिल्ड्रेन ट्राफिक पार्क अखेर सुरू..
डीपीतील रस्त्यांची यादी संकेतस्थळावर; महापालिका टाळणार फसवणूक
Nashik News I जिल्ह्यात आजपासून मराठा आरक्षण सर्वेक्षण
Latest Marathi News दुर्दैवी : वाघोलीत खाणीत बुडून दोन मुलांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.