Nashik News I जिल्ह्यात आजपासून मराठा आरक्षण सर्वेक्षण
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार मंगळवार (दि.२३)पासून मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत चालणाऱ्या सर्वेक्षणासाठी ११ हजार २३२ प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्त झाले असून, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्वेक्षणासाठी मदत करावी, असे आवाहन जनतेला केले आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांनी मुदतीत सर्वेक्षण पूर्ण करावे, अशा सूचना उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवारी (दि.२२) आयोजित मराठा सर्वेक्षण मोबाइल ॲप प्रशिक्षणाप्रसंगी दराडे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार वैशाली आव्हाड यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी दराडे म्हणाले, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी सहा हजार ६८२ प्रगणक व ४५४ पर्यवेक्षक अधिकारी नियुक्त केले आहेत. नाशिक शहरात दोन हजार ५४६ प्रगणक व १५९ पर्यवेक्षक हे सर्वेक्षण करतील. मालेगाव महापालिका क्षेत्रात एक हजार १६९ प्रगणक व ८० पर्यवेक्षक तसेच देवळाली कॅन्टोन्मेंटसाठी १३६ प्रगणक व सहा पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. या अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षण मोहिमेत पूर्ण योगदान द्यावे, असे सूचित करून निश्चित केलेली जबाबदारी दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी. नागरिकही त्यासाठी सहकार्य करतील, असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व उपस्थितांना सर्वेक्षणाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नियुक्त प्रगणक व कंसात पर्यवेक्षक
नाशिक तालुका : २५४ (१८)
इगतपुरी : ३६९ (२४),
कळवण : ४४५ (२९),
चांदवड : ३३५ (२१),
त्र्यंबकेश्वर : २८३ (२१),
दिंडोरी : ५६५ (३८),
देवळा : २९३ (२०),
नांदगाव : ५६३ (४४),
निफाड : ८४६ (५७),
पेठ : १०७ (८),
बागलाण : ७६५ (४९),
मालेगाव : ६७६ (४५),
येवला : ५६७ (४२),
सिन्नर : ४०३ (२७),
सुरगाणा : २१० (११),
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड : १३६ (६),
नाशिक महानगरपालिका क्षेत्र : २५४६ (१५९)
मालेगाव महानगरपालिका क्षेत्र : ११६९ (८०)
असे एकूण १० हजार ५३३ प्रगणक व ६९९ पर्यवेक्षक नियुक्त झाले आहेत.
हेही वाचा:
Horoscope Today : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, २३ जानेवारी २०२४
Kuno National Park | गुड न्यूज! ‘ज्वाला’ मादी चित्त्याने दिला ३ बछड्यांना जन्म
मंगळाच्या विषुववृत्तावर जमिनीखाली बर्फाचा स्तर
Latest Marathi News Nashik News I जिल्ह्यात आजपासून मराठा आरक्षण सर्वेक्षण Brought to You By : Bharat Live News Media.