फायनलमध्ये रोहितने ठोकला ऐतिहासिक ‘षटकार’, ‘हा’ विक्रम मोडला
पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Sixes Record : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे रविवारी (19 नोव्हेंबर) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्धशतक हुकले. तो 31 चेंडूत 151.61 च्या स्ट्राईक रेटने 47 धावा करून बाद झाला. या तडाखेबाज खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. यासह हिटमॅन रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार (86) मारणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला.
Rohit Sharma World Cup Record : रोहित बनला एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार
India vs Australia World Cup 2023 Final | वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराटने पाँटिंगला मागे टाकले
गेलचे इंग्लंडविरुद्ध 85 षटकार (Rohit Sharma Sixes Record)
एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणा-या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजा गेल आता दुस-या स्थानी आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध 85 षटकार ठोकले आहेत. तर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (63 षटकात विरुद्ध श्रीलंका) तिस-या आणि सनथ जयसूर्या (53 षटकार विरुद्ध पाकिस्तान) चौथ्या क्रमांकावर आहेत. रोहितने आतापर्यंत 9 आयसीसी टूर्नामेंटच्या फायनल खेळला असून त्याला एदाही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
रोहितच्या शर्माच्या नावावर आणखी एक विक्रम, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज
वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय कर्णधारांची कामगिरी
एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा रोहित दुसरा कर्णधार बनला आहे. याआधी 1983 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये कपिल देव यांनी 8 चेंडूत 15 धावांची इनिंग खेळली होती. 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सौरव गांगुलीने 25 चेंडूत 24 धावा केल्या होत्या. तो सामना भारताने गमावला होता. 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने 79 चेंडूत 91 धावा केल्या होत्या. (Rohit Sharma Sixes Record)
The post फायनलमध्ये रोहितने ठोकला ऐतिहासिक ‘षटकार’, ‘हा’ विक्रम मोडला appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Sixes Record : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे रविवारी (19 नोव्हेंबर) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्धशतक हुकले. तो 31 चेंडूत 151.61 च्या स्ट्राईक रेटने 47 धावा करून बाद झाला. या तडाखेबाज खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. यासह हिटमॅन रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक …
The post फायनलमध्ये रोहितने ठोकला ऐतिहासिक ‘षटकार’, ‘हा’ विक्रम मोडला appeared first on पुढारी.