६ हजार चौरस फुटांची महारांगोळी; १०० कलावंतांनी केली श्रीरामचरणी अर्पण
नागपूर ः श्रीराम, सीतामाई, परमभक्त श्री हनुमान, शरयू तीर, रामसेतू, मंगल तोरण, अक्षता कलश अशा सर्व प्रतिमांसह अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा व्हावी, यासाठी 500 वर्षांत ज्यांनी संघर्ष केले त्या महाराणी अहिल्याबाई होळकर, बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारत नागपुरातील 100 कलाकारांनी आपली महारांगोळीच्या माध्यमातून कला श्रीरामचरणी अर्पण केली.
अयोध्येतील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हल (आयपीएएफ), उत्तिष्ठ भारत आणि सिद्धिविनायक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बजाजनगर येथील बास्केटबॉल मैदानावर ही महारांगोळी साकारण्यात आली. संस्कार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत घरोटे यांच्या मार्गदर्शनात हर्षल कावरे, मोहिनी माकोडे, दीपाली हरदास यांच्यासह एकूण 100 कलाकारांनी 100 किलो पांढरी व 400 किलो विविधरंगी रांगोळीचा वापर करीत सलग सात तास अथक परिश्रम करीत 6 हजार चौ. फुटांची ही अतिशय सुरेख रांगोळी रेखाटली.
Latest Marathi News ६ हजार चौरस फुटांची महारांगोळी; १०० कलावंतांनी केली श्रीरामचरणी अर्पण Brought to You By : Bharat Live News Media.