राज्यात 65 टक्के उसाचे गाळप पूर्ण..
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात चालू वर्ष 2023-24 मध्ये सुमारे 920 लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. त्यामध्ये 21 जानेवारीअखेर 590 लाख टन म्हणजे जवळपास 65 टक्के उसाचे गाळप पूर्ण झाले आहे, तर 9.39 टक्के सरासरी उतार्यानुसार 55 लाख टन इतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. पुणे विभागाला ऊसगाळप आणि साखर उत्पादनात मागे टाकत आता कोल्हापूर विभागाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात सद्य:स्थितीत 97 सहकारी आणि 101 खासगी मिळून 198 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. या कारखान्यांची दैनिक ऊसगाळपाची क्षमता 9 लाख 19 हजार 850 टन इतकी आहे. गतवर्षी याच दिवशी 205 साखर कारखान्यांनी मिळून 680 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले होते, तर 9.61 टक्के सरासरी उतार्यानुसार 65 लाख टन साखरेचे उत्पादन तयार केले होते. याचा विचार करता चालू वर्षी अद्याप ऊसगाळप आणि साखर उत्पादन कमीच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्यात यंदाच्या हंगामअखेर 920 लाख टन ऊसगाळपातून सुमारे 90 लाख टन साखर उत्पादन तयार होण्याची अपेक्षा आहे. तरीसुद्धा 24 व 25 जानेवारी रोजी कारखान्यांच्या विभागनिहाय आढावा बैठका दोन दिवस आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिल्लक उसाचे गाळपाचे चित्र आणि अपेक्षित साखर उत्पादनाची निश्चित स्थिती समोर येईल.
– सचिन बर्हाटे, सहायक संचालक (विकास), साखर आयुक्तालय, पुणे
हेही वाचा
श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सार्या देशाने साजरी केली दिवाळी
पंतप्रधानांनी कामगारांवर केली गुलाब पुष्पांची वृष्टी
महाविकास आघाडीची गुरुवारी जागावाटपाची बैठक
Latest Marathi News राज्यात 65 टक्के उसाचे गाळप पूर्ण.. Brought to You By : Bharat Live News Media.