मराठा आरक्षण प्रकरणी क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी २४ जानेवारीला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटीशनवर (उपचारात्मक याचिका) सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीला मुंबईत दाखल होत आहेत, त्याच्या बरोबर दोन दिवस पूर्वी ही सुनावणी होणार आहे. दरम्यान, यापुर्वीची सुनावणी ६ डिसेंबरला झाली होती. मराठा आरक्षण प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून … The post मराठा आरक्षण प्रकरणी क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी २४ जानेवारीला appeared first on पुढारी.

मराठा आरक्षण प्रकरणी क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी २४ जानेवारीला

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटीशनवर (उपचारात्मक याचिका) सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीला मुंबईत दाखल होत आहेत, त्याच्या बरोबर दोन दिवस पूर्वी ही सुनावणी होणार आहे. दरम्यान, यापुर्वीची सुनावणी ६ डिसेंबरला झाली होती.
मराठा आरक्षण प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली होती. ६ डिसेंबरनंतर या याचिकेवर २४ जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असतानाच मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी इन चेंबर्स म्हणजेच न्यायमूर्तींच्या दालनात होईल. (त्यावेळी पक्षकार किंवा वकील उपस्थित राहू शकत नाहीत). सरन्यायाधीशांसह दोन न्यायाधीशांसमोर ही सुनावणी होईल.
मे २०२१ मध्ये न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता न्यायालय काय निर्णय घेणार हे महत्वाचे असणार आहे.
Latest Marathi News मराठा आरक्षण प्रकरणी क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी २४ जानेवारीला Brought to You By : Bharat Live News Media.