नाशिकमध्ये पुरवठा दाराकडून ५४ ग्रॅम एमडी जप्त
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- एमडी पुरवणाऱ्या संशयिताकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने २ लाख ७० हजार रुपयांचा ५४ ग्रॅम एमडी जप्त केले आहे. अनंत सर्जेराव जायभावे (३०, रा. स्वामी समर्थ नगर, आडगाव) असे पुरवठादाराचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पाथर्डी शिवारातून टिप्पर गँगचा सदस्य निखील बाळू पगारे (२९, रा. पाथर्डी फाटा) याच्यासह कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव (२२, रा. सिडको) यांना पकडले. दोघांकडून १ लाख रुपयांचे २० ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले. दोघांनाही संशयित अनंत जायभावे हा एमडी पुरवत असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनी अनंतलाही पकडले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केला. त्यावेळी अनंतकडून आणखी ५४ ग्रॅम एमडी जप्त केले आहे. या गुन्ह्यात इतर संशयित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा :
Nashik Crime News : रिकव्हरी एजंटच निघाला दुचाकीचोर
Shetkari Sangh election: शेतकरी संघाच्या निवडणुकीत शाहू आघाडीचा एकतर्फी विजय
Latest Marathi News नाशिकमध्ये पुरवठा दाराकडून ५४ ग्रॅम एमडी जप्त Brought to You By : Bharat Live News Media.