येवला गेटवर मोठे ट्रेलर अडकल्याने वाहतुक कोंडी
नगरसुल : Bharat Live News Media वृत्तसेवा– येवला तालुक्यातील नगरसुल अंडरपास बोगदा व येवला शहराजवळील रेल्वे गेटवर दिवसभर वाहतुक कोंडीने नागरिकांचा जीव अक्षरक्ष: मेटाकुटीस आला आहे.
मनमाड येथील ब्रिटीशकालीन पुलाचा काही भाग पडल्याने पुणे-इंदोर राज्यमार्ग बंद झाल्याने ही वाहतूक नांदगाव मार्गे येवल्याकडे वळविण्यात आलेली आहे. अवजड वाहनांमुळे नगरसुल अंडरपास बोगदा व येवला रेल्वे गेट क्रॉसिंग यावर दररोज दोन ते तीन वाहने अडकत असल्याने वाहतुक कोंडी होत आहे. नगरसुल येथील रेल्वेचा अंडरपास रस्त्याची उभारणी चुकीच्या पध्दतीने झाल्याने जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अंडरपासमध्ये पाणी वाहण्यासाठी रेल्वे अभियंत्यांनी दोन्ही बाजूने एक फुटाच्या नळ्या रस्त्यात बसविलेल्या आहेत. या नळ्यांमध्ये मोठ्या व लहान वाहनांचे टायर अडकत आहेत. परिणामी गाडी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. परिणामी वाहनांच्या रांगा लागत वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
त्याचप्रमाणे येवला रेल्वे गेट हे वळणादार असल्याने लांब पल्ल्याच्या व उंच गाड्या या गेटमधून निघत नसल्याने अडकतात. त्यामुळे लहान गाड्या रस्त्यावर अडकून वाहनांच्या रांगा लागत आहेत. येवला गेट व व नगरसुल रेल्वे अंडरपास बोगदा या ठिकाणी दररोज दोन ते तीन घटना घडतात त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे तरी दोन्ही ठिकाणी रेल्वे प्रशासनाने पाहणी करून दुरुस्ती करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे . दिनांक २२/१२०२४ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान येवला गेटवर मोठे ट्रेलर अडकल्याने ते ट्रेलर मागे घेत असताना उतारा मुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ते मोठे वाहनं अचानक रोडवर आडवी झाली त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली त्यावेळी लोकांनी अडकलेल्या ट्रेलरला सरळ करण्यासाठी क्रेन आणण्यात रोडवर उताराला आडवे झालेले मोठे ट्रेलर ओढून सरळ केले व कोंडलेली वाहतूक सुरू केली वाहतूक अडकल्याने गेट मन व रेल्वे कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.
हेही वाचा :
PM Modi Share Viral video : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर PM मोदींनी शेअर केला ‘तो’ व्हायरल व्हिडिओ
Shetkari Sangh election: शेतकरी संघाच्या निवडणुकीत शाहू आघाडीचा एकतर्फी विजय
मोठी बातमी! आमदार अपात्रता प्रकरण; विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
Latest Marathi News येवला गेटवर मोठे ट्रेलर अडकल्याने वाहतुक कोंडी Brought to You By : Bharat Live News Media.