अयोध्येतील राम मंदिर भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात: देवेंद्र फडणवीस
नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहेत हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा हा क्षण असल्यामुळे आपण सर्व रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला जावूया, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिराचे लोकार्पण क्षणाचा सोहळा रामनगर येथील राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघितल्यानंतर फडणवीस बोलत होते. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमास उत्तर भारतीय मोर्चाचे सुरेंद्र पांडे, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, शैलेश जोगळेकर, संजय बंगाले, जयप्रकाश गुप्ता, शाम पत्तरकीने, प्रणिता फुके, अश्विनी जिचकार, संदीप गवई आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, कारसेवकांचे बलिदान तसेच कोठारी बंधू यांनी भगवा प्रस्तापित करण्यासाठी केलेला संघर्ष अतुलनीय होता. सर्वांच्या त्यागातून व बलिदानातून आज भव्य राम मंदिर निर्माण झाले आहे.
यावेळी कारसेवक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक नृत्य करुन राम जन्मभूमी उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला.
हेही वाचा
नागपूर : राम जन्मभूमी आंदोलनातील सहभागाबद्दल फडणवीस यांना चांदीची गदा!
भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ ; उद्धव ठाकरे पोहोचले काळाराम मंदिरात
Ram Mandir inauguration | जय श्री राम! नागपूरमधील विद्यार्थी राम भजनात दंग, नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Latest Marathi News अयोध्येतील राम मंदिर भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात: देवेंद्र फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.