मराठा समाज सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी

धुळे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सुचनेनुसार 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण … The post मराठा समाज सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

मराठा समाज सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सुचनेनुसार 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षण कामसाठी विविध विभागातील शासकीय कर्मचारी यांची प्रगणक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. सदर सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी ते 31 जानेवारी,2024 पर्यंत करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणाकामी नियुक्त प्रगणक घरोघरी भेट देऊन मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन माहिती घेतली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी अचुक माहिती देऊन सर्वेक्षणास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.
हेही वाचा 

धुळेकरांसाठी आनंदाची बातमी, २०० गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार : खासदार सुभाष भामरे
खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप
धुळे शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी मंजूर : खासदार डॉ. सुभाष भामरे

Latest Marathi News मराठा समाज सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करा : जिल्हाधिकारी Brought to You By : Bharat Live News Media.