पीएम मोदी-अमिताभ यांच्या काही सेकंदाच्या भेटीत काय बोलणे झाले?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येत अनेक सेलिब्रिटींसोबत बिग बी अमिताभ बच्चन पोहोचले. यावेळचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बीग बींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (PM Modi-Amitabh Bachchan ) रामलल्ला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सर्व पाहुणे, दिग्गजांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी मंचावरून खाली येताच त्यांनी बॉलिवूड सेलेब्स ते राजकीय नेते आणि क्रीडा जगतातील सर्वांची भेट घेतली. यावेळी पीएम मोदींसमोर बिग बी येताच दोघांमध्ये काहीतरी संवाद झाला. हा अगदी काही मिनिटांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (PM Modi-Amitabh Bachchan )
संबंधित बातम्या –
Ram Mandir Pran Pratishtha : शंकर महादेवन, सोनू निगमने सुरेल आवाजात गायले भजन
Ram Lalla Virajman : रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा; अयोध्येतील खास क्षणचित्रे पाहा
Ram Mandir : अक्षयला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालं पण…; जॉर्डनमधील पोस्ट चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पाहुण्यांची भेट घेतली. यावेळी ते मंचावरून खाली उतरल्यानंतर त्यांच्यासमोर अमिताभ बच्चन आले. यावेळी पीएम मोदींनी सर्वांना हात जोडून अभिवादन केले. अमतिभ समोर आल्यानंतर मोदी थांबले. बिग बींनीही नमस्काराची मुद्रा करत त्यांना अभिवादन केले. त्यांच्यातील अगदी काही सेकंदातील भेटीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
#WATCH | PM Narendra Modi greets Actor Amitabh Bachchan present at the Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/72E2M0FcCD
— ANI (@ANI) January 22, 2024
दोघांमध्ये काय बोलणे झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये काही सेकंद बोलणे झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. दोघांमध्ये काय बोलणे झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बिग बींसोबत यावेळी अभिनेता अभिषेक कपूरदेखील होता. त्यानेही हात जोडून पीएम मोदी यांचे अभिवादन केले.
Latest Marathi News पीएम मोदी-अमिताभ यांच्या काही सेकंदाच्या भेटीत काय बोलणे झाले? Brought to You By : Bharat Live News Media.