ICCचा सर्वोत्तम टी-20 संघ जाहीर! सूर्यकुमारची कर्णधारपदी निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Mens T20 Team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2023 सालासाठीचा टी-20 संघ जाहीर केला आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्या व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग हे भारतीय खेळाडू संघाचा भाग आहेत. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूची आयसीसीच्या … The post ICCचा सर्वोत्तम टी-20 संघ जाहीर! सूर्यकुमारची कर्णधारपदी निवड appeared first on पुढारी.

ICCचा सर्वोत्तम टी-20 संघ जाहीर! सूर्यकुमारची कर्णधारपदी निवड

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ICC Mens T20 Team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2023 सालासाठीचा टी-20 संघ जाहीर केला आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्या व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग हे भारतीय खेळाडू संघाचा भाग आहेत. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूची आयसीसीच्या संघात निवड झालेली नाही.
जैस्वाल-साल्ट ओपनर
संघात झिम्बाब्वेचे दोन, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि युगांडाच्या प्रत्येकी एक-एक खेळाडूला समाविष्ट करण्यात आले आहे. भारताच्या यशस्वी जैस्वाल आणि इंग्लंडच्या फिल सॉल्ट यांची सलामी जोडी म्हणून निवड करण्यात आली आहे. दोघेही वेगाने धावा काढण्यात पटाईत आहेत. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला यष्टिरक्षक म्हणून स्थान देण्यात आले असून फलंदाजीत त्याला तिस-या स्थानी पसंती मिळाली आहे. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. मार्क चॅपमन (न्यूझीलंड) पाचव्या तर अष्टपैलू सिकंदर रझा (झिम्बाब्वे) सहाव्या स्थानावर आहे. आयसीसीने युगांडाच्या अल्पेश रामजानीलाही संघाचा भाग बनवले आहे. 2023 मध्ये त्याने 30 सामन्यांमध्ये 31.83 च्या सरासरीने 382 धावा केल्या आणि 8.98 च्या उत्कृष्ट सरासरीने 55 विकेट्स घेतल्या. त्याला फलंदाजी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर खेळण्याची संधी आयसीसीने दिली आहे. तर संघातील गोलंदाजांमध्ये मार्क अडायर (आयर्लंड), रवी बिश्नोई (भारत), रिचर्ड नागरवा (झिम्बाब्वे) आणि अर्शदीप सिंग (भारत) यांचा समावेश आहे. (ICC Mens T20 Team 2023)
2023 मध्ये सूर्याने चोपल्या सर्वाधिक धावा (ICC Mens T20 Team 2023)
2023 मध्ये, सूर्यकुमारने टी-20 क्रिकेटमध्ये 18 सामने खेळले आणि 48.86 च्या सरासरीने आणि 156 च्या स्ट्राइक रेटने 733 धावा केल्या. यादरम्यान, त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली. गेल्या वर्षी तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
जैस्वालची लक्षवेधी कामगिरी
यशस्वी जैस्वालने कसोटीसह टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही उत्कृष्ट कामगिरी केली. 2023 मध्ये त्याने 14 डावात 159 च्या स्ट्राईक रेटने 430 धावा केल्या. त्याने फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 51 चेंडूत 84* धावांची नाबाद खेळी खेळली आणि नेपाळविरुद्ध केवळ 49 चेंडूत 100 धावा फटकावल्या. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील टी20 मालिकेत 25 चेंडूत 53 धावा करून वर्षाचा शेवट केला. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 41 चेंडूत 60 धावा केल्या. (ICC Mens T20 Team 2023)
अर्शदीप सिंगने घेतल्या 26 विकेट
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 2023 मध्ये 21 सामन्यांत 26 विकेट घेतल्या. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2023 मध्ये 21 सामने खेळले. यादरम्यान त्याने 24.46 च्या सरासरीने 26 विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 9.26 राहिला असून 20 धावांत 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. दुसरीकडे बिश्नोईने 2023 मध्ये 11 टी-20 सामने खेळले आणि या 11 डावात त्याने 17.61 च्या उत्कृष्ट सरासरीने 18 बळी घेतले. त्याचा इकॉनॉमी रेट 7.20 राहिला. 24 धावांत तीन विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.
आयसीसी टीम ऑफ द इयर 2023 खालीलप्रमाणे
यशस्वी जैस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क अडायर, रवी बिश्नोई, रिचर्ड नागरवा आणि अर्शदीप सिंग.

India’s white-ball dynamo headlines the ICC Men’s T20I Team of the Year for 2023 🔥
Check out who made the final XI 👇https://t.co/QrQKGYbmu9
— ICC (@ICC) January 22, 2024

Latest Marathi News ICCचा सर्वोत्तम टी-20 संघ जाहीर! सूर्यकुमारची कर्णधारपदी निवड Brought to You By : Bharat Live News Media.