कोल्हापूर : शेतकरी संघाच्या निवडणुकीत शाहू आघाडीचा एकतर्फी विजय
कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व १७ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत शाहू आघाडीचे २ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीत अपक्षांचा धुव्वा उडाला. यामध्ये ११ पैकी ८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. आरोप- प्रत्यारोपामुळे ही निवडणूक गाजली होती. Shetkari Sangh election
शेतकरी सहकारी संघाच्या १९ संचालकांच्या जांगासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी ठेवण्यात आली होती. सकाळी आठ वाजत मतमोजणीस सुरुवात झाली. दुपारी दीड वाजता मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. Shetkari Sangh election
Shetkari Sangh election : विजयी उमेदवार, कंसात मिळालेली मते
व्यक्ती सभासद प्रतिनिधी : सर्जेराव कुंडलिक देसाई (१० हजार २६), जी. डी. पाटील (९ हजार ९४४), आनंदा गणपती बनकर (९ हजार ९१३), अमरसिंह रणजितसिंह माने (१० हजार १०१), अजित जयंवत मोहिते (१० हजार २५), दत्तात्रय विश्र्वासराव राणे (९ हजार ९७३) दत्ताजीराव पिराजीराव वारके (९ हजार ७३५)
संस्था संभासद प्रतिनिधी : आप्पासो आण्णासो चौगुले ( १ हजार २८१), सुभाष विष्णू जामदार (१ हजार २७९), प्रधान रंगराव पाटील ( १ हजार २६७), प्रविणसिंह विश्र्वनाथराव पाटील (१ हजार २७७), विजयसिंह युवराज पाटील (१ हजार २७७) जयकुमार बाळाप्पा मुनोळी (१ हजार २६६), बाबासाहेब शंकरराव शिंदे (१ हजार २७७)
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी: परशुराम महादेव कांबळे (११ हजार ३८३). महिला प्रतिनिधी: अपर्णा अमित पाटील (११ हजार २१६), राेहिणी धनाजी पाटील (११ हजार ४८). इतर मागास प्रवर्गातून सुनिल जबरचंद मोदी व विमुक्त भटक्या जमाती गटातून राजसिंह भगवानराव शेळके यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.
हेही वाचा
कोल्हापूर येथील शाहूपुरीतील प्रसिद्ध राम मंदिर
कोल्हापूर : पंत अमात्य बावडेकर घराण्याची रामभक्ती
कोल्हापूर : नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले तत्काळ द्या
Latest Marathi News कोल्हापूर : शेतकरी संघाच्या निवडणुकीत शाहू आघाडीचा एकतर्फी विजय Brought to You By : Bharat Live News Media.