11 लाखांना बोली, पाटोळ्याचा दबंग झाला कल्याणकर

सिन्नर(जि. नाशिक)- संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीमध्ये नाव कमावलेला पाटोळ्याचा ‘दबंग’ या बैलाची बोली तब्बल ११.१५ लाखांना झाली. बैलगाडा शर्यतीमध्ये नेहमीच चर्चेत असलेला चेहरा म्हणजे सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील दबंग. कारणही तसेच आहे आजपर्यंत त्याने महाराष्ट्रातील सातारा, कल्याण, पुणे, नाशिक आदी ठिकाणी बैलगाडा शर्यतीत बाजी मारत कायमच अवलस्थान पटकावले आहे. त्याच्या या गुणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात … The post 11 लाखांना बोली, पाटोळ्याचा दबंग झाला कल्याणकर appeared first on पुढारी.

11 लाखांना बोली, पाटोळ्याचा दबंग झाला कल्याणकर

सिन्नर(जि. नाशिक)- संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीमध्ये नाव कमावलेला पाटोळ्याचा ‘दबंग’ या बैलाची बोली तब्बल ११.१५ लाखांना झाली.
बैलगाडा शर्यतीमध्ये नेहमीच चर्चेत असलेला चेहरा म्हणजे सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील दबंग. कारणही तसेच आहे आजपर्यंत त्याने महाराष्ट्रातील सातारा, कल्याण, पुणे, नाशिक आदी ठिकाणी बैलगाडा शर्यतीत बाजी मारत कायमच अवलस्थान पटकावले आहे. त्याच्या या गुणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असते. आणि प्रत्येक बैलगाडामालकाला वाटते की, असा दबंग आपल्याकडे असायलाच हवा. त्या दबंगमुळे त्या मालकाचे नाव बैलगाडा शर्यतीमध्ये सर्व शेतकऱ्यांत आदराने घेतले जाते. म्हणूनच शिलगाव (कल्याण) येथील शेतकरी गोविंदभोईर यांनी तब्बल ११.१५ ला बोली लावत त्यास विकत घेतले. त्याची पाठवणी करताना तालुका भरातील
बैलगाडा शौकीन पाटोळे गावात जमा झाले होते. दबंग याचे मालक दीपक ज्ञानेश्वर खताळे यांनीही जिवापाड त्याच्यावर प्रेम केलेले
असल्याने दबंग आता आपल्या परिवारातील सदस्य राहायला नसून, तो कल्याणला जाणार असल्यामुळे संपूर्ण कुटुंबही भावुक झाले होते.
सव्वा अकरा लाखांना खरेदी
शिलगाव कल्याण येथील बैलगाडामालक व शेतकरी यांनी ‘दबंग’ या बैलाला तब्बल ११.१५ लाखांना विकत घेतले. ‘दबंग’ची भव्य मिरवणूक पाटोळे गावातून डीजेच्या तालात काढण्यात येऊन त्याची पाठवण करण्यात आली. यावेळी दीपक खताळे, दिलीप मुंगळे, गोकुळ कराड आदींसह संपूर्ण गाव आणि बैलगाडामालक भावुक झाले होते.
हेही वाचा :
Ayodhya Ram Mandir Inauguration : रामलल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांवर कापडाची पट्टी का बांधली होती?
Nana Patole : राहुल गांधीना मंदिरात प्रवेश नाकारणारे हे कोण? पटोलेंचा सरकारला सवाल
Ram Mandir PranPrathistha: ‘मी पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती…’ : शिल्पकार अरुण योगीराज
Latest Marathi News 11 लाखांना बोली, पाटोळ्याचा दबंग झाला कल्याणकर Brought to You By : Bharat Live News Media.