रामलल्लांच्या मूर्तीच्या डोळ्यांवर कापडाची पट्टी का बांधली होती?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.२२) दुपारी १२.२९ वाजण्याच्या अभिजित मुहूर्तावर श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. अन् भगवान श्रीराम भव्य आणि दिव्य मंदिरात विधीवत विराजमान झाले. आज अखेरीस तो ऐतिहासिक दिवस आला, आणि सुमारे ५०० वर्षांपासून प्रतीक्षा संपली. Ayodhya Ram Mandir Inauguration
आज भगवान श्रीराम त्यांच्या जन्मभूमी अयोध्येत विराजमान झाले. मंत्रोच्चार आणि विधीवत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी इतरही अनेक प्रथा परंपरा पाळल्याच्या दिसून आल्या. रामलल्लांचे अनेक मनमोहक फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली आहे. तसेच डोळ्याची पट्टी काढताच आरसा दाखविला. यामागेही काही कारणे असल्याचे सांगितले जाते. Ayodhya Ram Mandir Inauguration
देवाच्या मूर्तीच्या डोळ्याभोवती वस्त्र का बांधले जाते?
प्राणप्रतिष्ठेदरम्यान राम मंदिराच्या गर्भगृहातील प्रभू रामाच्या मूर्तीच्या डोळ्याभोवती पट्टी बांधली होती. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा पूजा आटोपल्यानंतर ही पट्टी काढण्यात आली. ज्योतिषांच्या मते, जसे लहान मूलं आईच्या उदरातून जन्म घेते, तेव्हा त्याच्या डोळ्यांवर एक कपडा टाकला जातो जेणेकरून त्याच्या डोळ्यांना तीव्र प्रकाशाचा त्रास होऊ नये. या कारणास्तव रामलल्लाच्या डोळ्यावर वस्त्र बांधले होते.
त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठेदरम्यान जल अधिवास, गंधाधिवास, धन्य अधिवास असे अनेक विधी केले जातात. या वेळी मूर्तीमध्ये तेजस्वी प्रकाशही प्रस्थापित केला जातो. या काळात नेत्रचिकित्सा केली जाते, ज्यामध्ये डोळ्यांभोवती कापड बांधले जाते आणि डोळ्यांवर मध लावला जातो.
Ayodhya Ram Mandir Inauguration श्रीरामांची मूर्ती आरशात का दाखवली?
हिंदू धर्मात कोणत्याही देवतेच्या प्राणास पवित्र करताना कोणत्याही देवतेच्या डोळ्यांवर कपडा बांधण्याची तसेच आरसा दाखवण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की प्राणप्रतिष्ठेदरम्यान मूर्तीच्या डोळ्यात ऊर्जा किंवा तेज निर्माण होते. जे खूप अमर्यादित वेगाने घडते. अशा स्थितीत डोळ्यांची पट्टी काढल्यावर त्यांचे प्रतिबिंब आरशात दिसते, त्यामुळे ते परत त्यांच्याकडे जाते.
हेही वाचा
पंतप्रधान मोदींनी जिथे संकल्प केला तिथेच मंदिर बांधलं : योगी आदित्यनाथ
Ramlala Pran pratishtha : ‘रामलल्ला’समोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला साष्टांग दंडवत
Ayodhya Ram Mandir Inauguration | अखेर अयोध्येत श्रीराम अवतरले! पीएम मोदींच्या उपस्थितीत पार पडली रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा
The post रामलल्लांच्या मूर्तीच्या डोळ्यांवर कापडाची पट्टी का बांधली होती? appeared first on Bharat Live News Media.
