काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेसचे माजी खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सोनिया गांधीचे एकनिष्ठ शिलेदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले डॉक्टर उल्हास पाटील हे त्यांच्या कन्येसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हयाचे राजकीय गणित बदलणार असून काँग्रेसला मोठे  खिंडार पडले आहे. डॉ. उल्हास पाटील हे त्यांची … The post काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात appeared first on पुढारी.

काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा; काँग्रेसचे माजी खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सोनिया गांधीचे एकनिष्ठ शिलेदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले डॉक्टर उल्हास पाटील हे त्यांच्या कन्येसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हयाचे राजकीय गणित बदलणार असून काँग्रेसला मोठे  खिंडार पडले आहे.
डॉ. उल्हास पाटील हे त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह (दि. 24) दुपारी 2 वाजेला मुंबईत भाजपा पक्षात प्रवेश करणार आहेत.  जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा व काँग्रेसची सर्वात मोठी ताकद डॉक्टर उल्हास पाटील यांनी काँग्रेसला रामराम केल्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे. तसेच येत्या काळात रावेर लोकसभा मतदारसंघात फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे.  या चर्चेला पुष्टी मिळाली जरी नसली तरी या प्रवेशामुळे राजकीय समीकरण बदलणार हे मात्र निश्चित झाले आहे. डॉ. केतकी पाटील यापूर्वी भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित होते,   मात्र त्यानंतर डॉ. उल्हास पाटील सुद्धा भाजप प्रवेश करणार असल्याने अनेक राजकीय समीकरणे बदललेली आहेत. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलणार या चर्चांना उधान आले आहे.  दरम्यान डॉ. केतकी पाटील यांनी भाजपा प्रवेश घेण्यापूर्वीच ग्रामीण भागात संपर्क अभियान सुरू केले आहेत. त्यामुळे त्या रावेर लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार असतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत डॉक्टर उल्हास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपण कोणताही स्वार्थ ठेवून पक्ष प्रवेश करत नसून पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :

Ayodhya Ram Mandir: आपआपसांत समन्वय साधत धार्मिक आचारण आवश्यक : सरसंघचालक मोहन भागवत
Ayodhya Ram Mandir : अक्षय-प्रणिता सुभाषपर्यत ‘या’ सेलेब्रिटींनी राम मंदिराच्या उभारणीत केलं महादान
Ayodhya Ram Mandir : अक्षय-प्रणिता सुभाषपर्यत ‘या’ सेलेब्रिटींनी राम मंदिराच्या उभारणीत केलं महादान

Latest Marathi News काँग्रेसला रामराम करून डॉ. उल्हास पाटील कन्येसह जाणार भाजपात Brought to You By : Bharat Live News Media.