Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिरात अभूतपूर्व उत्साहात आज (दि. २२ ) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. 500 वर्षांहून अधिक प्रतीक्षेनंतर प्रभू रामलल्ला आपल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्या राम मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान आहे. जिथे त्यांची आरती करण्यात आली. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा विधीनंतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्ला मूर्तीसमाेर साष्टांग दंडवत घातला.
प्राणप्रतिष्ठा विधीनंतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्ला मूर्तीला साष्टांग दंडवत घातला. यानंतर त्यांनी मंदिराला प्रदक्षिणाही केली. राम मंदिराची पायाभरणी करणाऱ्या कामेश्वर चौपाल यांची पंतप्रधानांनी मंदिरात भेट घेतली. आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यजमान बनले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात प्रवेश करताना चांदीची छत्री घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरात साधूंचे आशीर्वाद घेतले.
PM Modi performs ‘aarti’ of Ram Lalla in Ayodhya temple, does ‘dandvat pranam’
Read @ANI Story | https://t.co/ZuYdaEyxlD#Ayodhya #RamTemple #LordRam #RamLalla #RamMandirPranPrathistha #PranPratishta #NarendraModi pic.twitter.com/nArgSZbFIZ
— ANI Digital (@ani_digital) January 22, 2024
Latest Marathi News ‘रामलल्ला’समोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत Brought to You By : Bharat Live News Media.