पीएम मोदींनी ११ दिवसांचे अनुष्ठाण सोडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्‍ज झाला होता. राम मंदिराचे उद्घाटन आज ( दि. २२)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते झाले. यादरम्यान रामलल्‍लामूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, या सोहळ्यासाठी देश-विदेशातील 11 हजारांहून अधिक व्‍हीआयपींना (अति महत्वपूर्ण व्यक्ती) आमंत्रण देण्‍यात आले आहे. दरम्यान, पीएम मोदी हे रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधीच्या 11 दिवस … The post पीएम मोदींनी ११ दिवसांचे अनुष्ठाण सोडले appeared first on पुढारी.

पीएम मोदींनी ११ दिवसांचे अनुष्ठाण सोडले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्‍ज झाला होता. राम मंदिराचे उद्घाटन आज ( दि. २२)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते झाले. यादरम्यान रामलल्‍लामूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, या सोहळ्यासाठी देश-विदेशातील 11 हजारांहून अधिक व्‍हीआयपींना (अति महत्वपूर्ण व्यक्ती) आमंत्रण देण्‍यात आले आहे. दरम्यान, पीएम मोदी हे रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधीच्या 11 दिवस आधीपासून धार्मिक अनुष्ठान करत होते. हे धार्मिक अनुष्ठान सोडले. ( Ayodhya Ram Mandir ) अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकनंतर पंतप्रधान मोदींनी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हातून चरणामृत घेऊन 11 दिवसांचे अनुष्ठान पूर्ण केले.

 Ayodhya Ram Mandir : 11 दिवस कठोर अनुष्ठान…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या धार्मिक अनुष्ठानाला १२ जानेवारी रोजी सुरुवात झाली होती.अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी पंतप्रधान मोदी जमिनीवरच झोप घेत होते. तसेच ते 11 दिवसांच्या अनुष्ठानादरम्यान ते फक्त नारळ पाण्याचे सेवन करत होते. ते अष्टांग योगातील यम-नियमांचे पालन करून अनुष्ठान करत आहेत, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले होते. प्राणप्रतिष्ठा हे देवतेच्या मूर्तीमध्ये दैवी चेतनेचे प्रकटीकरण म्हणून वर्णन केले आहे. पवित्र शास्त्रात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी उपवास करण्याच्या नियमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 दिवस कठोर अनुष्ठान करण्यासोबतच उपवास करण्याचा निर्णय घेतला होता. असे सूत्रांनी म्‍हटलं होते. (Ayodhya Ram mandir Pran Pratishtha)

यम -नियमाचा अर्थ खूप व्यापक आहे. यम म्हणजे संयम आणि नियम म्हणजे शिस्त जो अष्टांग योगाचा एक भाग आहे. योगाचे मूळ ध्येय म्हणजे समाधीपर्यंत पोहोचणे म्हणजेच ब्रह्मामध्ये विलीन होणे. ध्यान म्हणजे पाहणे म्हणजेच ब्रह्माशी एकाग्र होणे आणि ब्रह्माचे चिंतन करणे. त्याचा दुसरा भाग म्हणजे भजन अर्थात ईश्वराची उपासना करणे. तसेच, अष्टांग योगाचे आठ भागांमध्‍ये  यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीचा समावेश आहे.

#WATCH | PM Narendra Modi breaks his fast after the ‘Pran Pratishtha’ ceremony at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya. #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/Zng1IHJ2FJ
— ANI (@ANI) January 22, 2024

हेही वाचा :

PM मोदींनी हेलिकॅप्टरमधून शूट केला अयोध्या राम मंदिराचा व्हिडिओ
Ayodhya Ram Mandir Inauguration : जगातील 50 भाषांतून रामायण
राम मंदिरावर आरतीदरम्यान होणार लष्कराच्‍या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Ram Mandir Pran Prathistha : अयोध्येत बिग बी, सचिन तेंडुलकरसह दिग्गज सेलिब्रिटी दाखल, कोण कोण ते पाहा (Videos)
Ayodhya Ram Mandir Updates: राम प्रतिष्ठापणा सोहळा; केंद्राकडून अर्धी सुटी जाहीर
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिरातील आरतीत सहभागी व्हायचेय? अशी करा बुकिंग

Latest Marathi News पीएम मोदींनी ११ दिवसांचे अनुष्ठाण सोडले Brought to You By : Bharat Live News Media.