Australian Open 2024 : जोकोव्हिचचा धडाका सुरूच; उपांत्यपूर्व फेरीत दाखल
मेलबर्न, वृत्तसंस्था : अग्रमानांकित आणि चोवीस वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोव्हिचयाने येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन (Australian Open 2024) खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिला गटात अव्वल मानांकित आर्यना साबालेंका आणि कोको गॉफ यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
जोकोव्हिचने ऑड्रियन मानारिओ याचा 6-0, 6-0, 6-3 असा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडला. यावेळी पुन्हा एकदा जोकोव्हिचकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. ग्रीसच्या सातव्या मानांकित स्टीफोनास त्सित्सिपास याला पराभवाचा धक्का बसला आहे. त्याला टेलर फ्रिट्झ याने चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत खडे चारले. (Australian Open 2024)
महिला विभागात साबालेंकाने पुढील फेरीत प्रवेश करताना अमेरिकेच्या अॅमांडा अॅनिसिमोव्हाचे आव्हान 6-3, 6-2 असे सहजगत्या परतवून लावले. अमेरिकेच्या गॉफने पोलंडच्या मॅग्दलेना फ्रेचला सरळ सेटमध्ये पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले.
The post Australian Open 2024 : जोकोव्हिचचा धडाका सुरूच; उपांत्यपूर्व फेरीत दाखल appeared first on Bharat Live News Media.