कृषिकला उच्चांकी गर्दी; आज प्रदर्शनाचा अखेरचा दिवस
बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषिक प्रदर्शनाला रविवारी (दि. 21) प्रचंड गर्दी झाली. 110 एकराचा परिसर शेतकर्यांनी फुलून गेला होता. रविवारी राज्याच्या विविध भांगासह बिहार, गुजरात, कनार्टक इत्यादी राज्यातील शेतकर्यांनी आवर्जून भेट दिली. भाजीपाला पिके, प्रदर्शनातील स्टॉल्स, आंतरमशागतीची अवजारे प्रात्यक्षिके, सूक्ष्म सिंचन, त्याचबरोबर मधुमक्षिका पालन, फुल शेती इत्यादी प्रात्यक्षिकांची शेतकर्यांनी माहिती घेतली.
रविवार सुटीचा दिवस असल्याने सकाळी नऊपासूनच शेतकर्यांचा ओघ या ठिकाणी वाढला होता. शेतकर्यांना अडचण होऊ नये अशा पद्धतीचे संस्थेमार्फत नियोजन केले होते. रविवारी आयोजित अश्व प्रदर्शनात भीमथडी जातीच्या 60 हून अधिक अश्वांचा सहभाग होता.
सोमवारी कालवडी स्पर्धा व दुग्ध उत्पादन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 22) प्रदर्शनाची अखेर होणार आहे. राज्य सरकारकडून सोमवारी सुटी जाहीर केल्याने गर्दी वाढणार असून, त्या पद्धतीचे नियोजन संस्थेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा
‘मराठ्यांनी थांबावे, ही सरकारची इच्छा’ : उपमुख्यमंत्री अजित पवार
सर्वात धोकादायक पुलाचा व्हिडीओ!
शेतकर्यांच्या कर्जमाफीला प्राधान्य : खासदार सुप्रिया सुळे
Latest Marathi News कृषिकला उच्चांकी गर्दी; आज प्रदर्शनाचा अखेरचा दिवस Brought to You By : Bharat Live News Media.