हवेली तहसीलने 155 ची सर्व प्रकरणे चौकशीसाठी दिलीच नाही

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने कलम 155 च्या आदेशाची पडताळणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी पथकास हवेली तहसील कार्यालयात तपासणीसाठी सर्व प्रकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे समितीच्या अहवालावरून दिसून आले आहे. वर्षनिहाय प्रत्यक्ष प्रकरणे आणि तपासणीस उपलब्ध प्रकरणे, यामध्ये तफावत आहे. एकाच संकलनाच्या दोन नोंदवह्या आढळून आल्या आहेत. 2018 पासून दोन नोंदवह्या … The post हवेली तहसीलने 155 ची सर्व प्रकरणे चौकशीसाठी दिलीच नाही appeared first on पुढारी.

हवेली तहसीलने 155 ची सर्व प्रकरणे चौकशीसाठी दिलीच नाही

लोणी काळभोर : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य शासनाने कलम 155 च्या आदेशाची पडताळणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी पथकास हवेली तहसील कार्यालयात तपासणीसाठी सर्व प्रकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे समितीच्या अहवालावरून दिसून आले आहे. वर्षनिहाय प्रत्यक्ष प्रकरणे आणि तपासणीस उपलब्ध प्रकरणे, यामध्ये तफावत आहे. एकाच संकलनाच्या दोन नोंदवह्या आढळून आल्या आहेत. 2018 पासून दोन नोंदवह्या असल्याचे दिसून आले. परंतु, प्रत्यक्षात तपासणीसाठी एकच नोंदवही उपब्लध करून देण्यात आल्याने 2018 ते 2023 मधील कालवधीत पारीत झालेली प्रकरणे तपासून मेळ घालता आलेला नाही.
कलम 155 मधील नोंदवहीत आदेश पारीत असलेली प्रकरणे व प्रत्यक्षात तपासणी कामी उपलब्ध करून दिलेली प्रकरणे, याचा मेळ घातला असता तब्बल 530 प्रकरणे रेकॉर्डवर कोठेच आढळून आली नाहीत. फक्त पारीत आदेशाच्या नोंदी वहीत आढळून आल्या. चौकशी समितीने हवेली तहसील कार्यालयाला पत्र देऊन सर्व नोंदवह्या तसेच पारीत आदेश उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली, त्यानंतरही संपूर्ण अभिलेख तपासणीकामी उपलब्ध करून दिलेले नसल्याचे अहवालात नमूद आहे.
हवेली तहसील कार्यालयाने चौकशी पथकास उपलब्ध करून दिलेली पारीत आदेशाची संख्या 3,494 आहे, तर त्यापैकी मंजूर केलेल्या प्रकरणातील संख्या 1,947 आहे, तर नोंदवहीप्रमाणे तपासणीसाठी उपलब्ध न दिलेली 530 प्रकरणे आहेत. चौकशी अहवाल राज्य शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या गोपनीय अहवालावर काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे व पुन्हा विशेष चौकशी समिती गठित करून हवेली तहसील कार्यालयाचे संपूर्ण ऑडिट करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभाग व पुणे विभागीय आयुक्त यांनी कलम 155 अन्वये दिलेल्या आदेशांची तपासणी करण्याकामी नियुक्ती केलेल्या चौकशी पथकाने हवेली तालुक्यातील महसूल कार्यालयातील तपासणी चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. यामध्ये अनेक गंभीर ताशेरे ओढले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या चौकशी पथकास तहसील कार्यालयातील कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही तसेच या कार्यालयात दोन नोंदवह्या आढळून आल्या. सन 2018 पासून संकलनातील दोन वेगवेगळ्या नोंदवही आढळून आल्या. प्रत्यक्ष तपासणीकामी एकाच संकलनाकडील नोंदवही उपलब्ध करून दिली.
हेही वाचा

जनाई-शिरसाईवरून काका-पुतण्यात श्रेयवाद..
सर्वात धोकादायक पुलाचा व्हिडीओ!
रशियातील अनोखे थीम पार्क

Latest Marathi News हवेली तहसीलने 155 ची सर्व प्रकरणे चौकशीसाठी दिलीच नाही Brought to You By : Bharat Live News Media.