“ढोंगी रामभक्तांना…” आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवार, २३ जानेवारी नाशिकमध्ये होत आहे. या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (दि. 22) नाशिकमध्ये दाखल होत असून, भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन … The post “ढोंगी रामभक्तांना…” आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा appeared first on पुढारी.
“ढोंगी रामभक्तांना…” आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवार, २३ जानेवारी नाशिकमध्ये होत आहे. या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (दि. 22) नाशिकमध्ये दाखल होत असून, भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन व महापूजा करतील. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्‍या X (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. (Ayodhya Ram Mandir)
Ayodhya Ram Mandir : ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?
आशिष शेलार यांनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की,  “भगवान श्री काळारामासमोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल, पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली, लालबागच्या राजावर पण बंदी आणली, रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली, रथयात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली, राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेची फळे चाखली अशां ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का? आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा… उबाठा शाखा अंधारात आणि गोदातिरावर थयथयाट. जो न रहा राम का, वो न किसी काम का!”
प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास
प्रभू रामांनी सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या नाशिक नगरीतील एक भक्त प्रभू श्री रामांच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास करीत निघाला आहे. महिनाभरापासून हा प्रवास सुरू असून 25 ते 26 जानेवारीपर्यंत प्रभू श्री रामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीत हा भक्त पोहोचणार आहे. तोंडी श्री रामांचे नामस्मरण करीत हा प्रवास सुरू असून तब्बल दीड हजार कि.मी.चा हा संपूर्ण प्रवास आहे. विरेंद्रसिंग गोपाळसिंग टीळे असे या भक्ताचे नाव आहे. दररोज 35 ते 50 किमी पायी प्रवास करीत आता ते प्रयागराज येथे पोहोचले आहेत.

भगवान श्री काळारामा समोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल…
◆ पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत
◆ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली
◆लालबागच्या राजावर पण बंदी आणली
◆रामभक्तांच्या रक्ताने…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 22, 2024

हेही वाचा 

Ram Mandir pran pratishtha : रघुवंशाचे तार पार कोरियापर्यंतही
Maratha Reservation : ‘अजूनही त्यांनी थांबावे, अशी सरकारची इच्छा,’ मराठा समाजाला अजित पवार यांचा सल्ला
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा : घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य
Kangana Ranaut Ayodhya : अभिनेत्री कंगना अयोध्येत दाखल; म्‍हणाले, “एका नवीन युगाची…’
Ayodhya Ram Mandir LIVE | ५०० वर्षांची प्रतीक्षा संपणार, राम आज अयोध्येत येणार; रामलल्लाचा श्रृंगार सुरू
Interfaith Marriages : आंतरधर्मीय लग्‍नासाठी धर्मांतरापूर्वी द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र : उच्‍च न्‍यायालयाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे

Latest Marathi News “ढोंगी रामभक्तांना…” आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा Brought to You By : Bharat Live News Media.