रामनामाचा जप करत होती महिला अन् घडले आश्चर्य!

नवी दिल्ली : आज अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असताना याचदरम्यान हा चमत्कारिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक महिला रामनामाचा जप करत असताना जे आश्चर्य घडले, ते निव्वळ अवर्णनीय ठरले अन् म्हणूनच अतिशय अल्पावधीत हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. अवघी अयोध्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सजली असताना कोणी भजन गाताना दिसून येते, … The post रामनामाचा जप करत होती महिला अन् घडले आश्चर्य! appeared first on पुढारी.

रामनामाचा जप करत होती महिला अन् घडले आश्चर्य!

नवी दिल्ली : आज अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असताना याचदरम्यान हा चमत्कारिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक महिला रामनामाचा जप करत असताना जे आश्चर्य घडले, ते निव्वळ अवर्णनीय ठरले अन् म्हणूनच अतिशय अल्पावधीत हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.
अवघी अयोध्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सजली असताना कोणी भजन गाताना दिसून येते, तर कोणी रामनामाचा जप करताना दिसून येते. एक महिला असाच रामनामाचा जप करत असताना नेमके काय होते, याचेच चित्रण या व्हिडीओत दिसून येते. यात ती महिला ‘जय श्री राम… जय श्री राम..’ असा रामनामाचा जप करते आहे. इतक्यात एक लंगडत चाललेले एक माकड हळूहळू रामनामाचा जप करणार्‍या त्या महिलेच्या जवळ येते आणि तिच्या पायावर बसते. तिला मिठीही मारते.
एखाद्या मुलाने आपल्या आईच्या कुशीत जाऊन तिला बिलगावे अगदी तसेच हे माकड त्या महिलेला बिलगते. महिलेला साहजिकच दाटून येते. ती रडू लागते, पण रामनामाचा जप सुरूच ठेवते. माकडही तिच्या मांडीवर शांत बसून राहते. महिला आपल्या मुलाप्रमाणे त्याच्या पाठीवरून हात फिरवते.
हा अद्भुत व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. रामनामाचा जप करताना एक माकड घरात प्रवेश करते आणि एक चमत्कार घडतो. भक्त खरोखर धन्य आहे. ‘जय श्री राम’असे या व्हिडीओत नमूद केले गेले आहे.
Latest Marathi News रामनामाचा जप करत होती महिला अन् घडले आश्चर्य! Brought to You By : Bharat Live News Media.