Nora Fatehi ‘Deepfake’ Video : नोराही डीपफेकची बळी!

सध्या बॉलीवूड सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ करून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदाना, कॅटरिना कैफ, काजोल, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता नोरा फतेहीसुद्धा (Nora Fatehi ‘Deepfake’ Video) डीपफेकला बळी पडली आहे. व्हिडीओमध्ये नोरा एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. नोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या डीपफेक व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. … The post Nora Fatehi ‘Deepfake’ Video : नोराही डीपफेकची बळी! appeared first on पुढारी.

Nora Fatehi ‘Deepfake’ Video : नोराही डीपफेकची बळी!

सध्या बॉलीवूड सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ करून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदाना, कॅटरिना कैफ, काजोल, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता नोरा फतेहीसुद्धा (Nora Fatehi ‘Deepfake’ Video) डीपफेकला बळी पडली आहे. व्हिडीओमध्ये नोरा एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे.
नोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या डीपफेक व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मला धक्का बसला, ही मी नाही, अशी प्रतिक्रिया नोराने दिली आहे. नोराच्या डीपफेक व्हिडीओत ती फॅशन ब्रँडच्या सीझनच्या शेवटी विक्रीची जाहिरात करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये नोराचा आवाज, चेहरा आणि तिची देहबोली अशी एडिट केली आहे की बघणार्‍यांना ती नोराच असल्यासारखे वाटते.
या डीपफेक व्हिडीओत ज्या फॅशन ब्रँडचे नाव दिसत आहे, त्यांनी असे काहीच केले नसल्याचे सांगितले आहे.अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात, दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने 24 वर्षीय अभियंता इमानी नवीन हिला आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. आरोपी इमानी नवीन ही रश्मिकाचे फॅन पेज चालवत होती. (Nora Fatehi ‘Deepfake’ Video)
हेही वाचा…

‘श्रीमद् रामायण’मध्ये पुन्हा पाहता येणार प्रभू श्रीरामांचा प्रवास

Latest Marathi News Nora Fatehi ‘Deepfake’ Video : नोराही डीपफेकची बळी! Brought to You By : Bharat Live News Media.