रामलल्ला प्राणप्रतिष्ठा : घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य

आज (दि.२१) अयोध्येत होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला प्रत्यक्ष हजर राहणे प्रत्येकाला शक्य नाही; पण घरीच रामलल्लाची पूजा करून पुण्यार्जन शक्य आहे, असे विख्यात ज्योतिषाचार्य तसेच हस्तरेषातज्ज्ञ पंडित विनोद सोनी पोद्दार यांनी सांगितले. पूजेसाठी हे साहित्य पूजा साहित्यात सुपारी, उप मणिबंध (कलावा), कुंकू, अक्षता (तांदूळ), गंगाजल, तांब्याच्या पेल्यात जल, श्रीरामाची प्रतिमा, शुद्ध तूप, धूप अगरबत्ती, चंदन, … The post रामलल्ला प्राणप्रतिष्ठा : घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य appeared first on पुढारी.

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा : घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य

आज (दि.२१) अयोध्येत होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला प्रत्यक्ष हजर राहणे प्रत्येकाला शक्य नाही; पण घरीच रामलल्लाची पूजा करून पुण्यार्जन शक्य आहे, असे विख्यात ज्योतिषाचार्य तसेच हस्तरेषातज्ज्ञ पंडित विनोद सोनी पोद्दार यांनी सांगितले.
पूजेसाठी हे साहित्य
पूजा साहित्यात सुपारी, उप मणिबंध (कलावा), कुंकू, अक्षता (तांदूळ), गंगाजल, तांब्याच्या पेल्यात जल, श्रीरामाची प्रतिमा, शुद्ध तूप, धूप अगरबत्ती, चंदन, फुले, फळे, मिठाई, कापूर, घंटी, पूजा थाळी, अगरबत्ती
…अशी करा पूजा

पूजास्थळ उत्तर आणि पूर्व दिशेचा मध्यभाग म्हणजे घरातील ईशान्य कोपर्‍यात असावे.
इशान्य भाग शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम मानला जातो. येथे छोटेखानी देव्हारा बसवा. पूजास्थळावरून जुने सामान, शिळी फुले, फुलमाळा काढून घ्या.
देव्हार्‍यातील सर्व देव धुवा. प्रतिमा पुसून घ्या. स्वच्छ वस्त्रे धारण करा. पाटावर लाल कापड टाका. त्यावर श्रीरामाची मूर्ती वा प्रतिमा बसवा.
पूजेसाठी ब्राह्मणालाही बोलावू शकता. स्वत: केली तरी चालेल.
पूजेस प्रारंभापूर्वी हातात जल घेऊन पूजेचा संकल्प सोडावा. मूर्तीला जलाभिषेक आवर्जून करावा. पंचामृताने न्हाऊ घालावे. दिवा लावावा. धूपबत्ती, अगरबत्ती चेतवावी. कुंकू, अक्षता, चंदन, फुल, फळे, मिठाई, पंचामृत, खीर रामाला अर्पण करावी. शेवटी कापूर पेटवावा आणि आरती करावी.
या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. पूर्व दिशेला तोंड करून विधी संपन्न करावा. देव्हार्‍यात खंडित मूर्ती ठेवू नये. शक्यतो नवी मूर्ती आणावी.
शुभ मुहूर्तावरच (अभिजित मुहूर्त) ती देव्हार्‍यात स्थापन करावी. याच वेळेला अयोध्येतही रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, असेही ज्योतिषाचार्य पोद्दार यांचे म्हणणे आहे.

Latest Marathi News रामलल्ला प्राणप्रतिष्ठा : घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य Brought to You By : Bharat Live News Media.