कोल्हापूर : मैत्रीण म्हणून आली अन् दागिन्यांवर डल्ला मारून गेली, खोचीतील घटना

किणी; पुढारी वृत्तसेवा : मैत्रीण म्हणून आलेल्या महिलेने विश्वासाचा गैरफायदा घेत सुमारे तीन लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.पोलिसांनी आठ दिवसात चोरीचा छडा लावत रागीणी गणेश कदम (वय २७ , रा.मसुचीवाडी, ता. वाळवा, जि.सांगली) या महिलेस अटक केली. खोची (ता.हातकणंगले) येथे आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची हकीकत अशी की, खोचीच्या दसरा चौकात राहणाऱ्या सौ.मोनिका सुयोग पाटील … The post कोल्हापूर : मैत्रीण म्हणून आली अन् दागिन्यांवर डल्ला मारून गेली, खोचीतील घटना appeared first on पुढारी.

कोल्हापूर : मैत्रीण म्हणून आली अन् दागिन्यांवर डल्ला मारून गेली, खोचीतील घटना

किणी; Bharat Live News Media वृत्तसेवा : मैत्रीण म्हणून आलेल्या महिलेने विश्वासाचा गैरफायदा घेत सुमारे तीन लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.पोलिसांनी आठ दिवसात चोरीचा छडा लावत रागीणी गणेश कदम (वय २७ , रा.मसुचीवाडी, ता. वाळवा, जि.सांगली) या महिलेस अटक केली.
खोची (ता.हातकणंगले) येथे आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची हकीकत अशी की, खोचीच्या दसरा चौकात राहणाऱ्या सौ.मोनिका सुयोग पाटील यांची बालपणीची मैत्रीण रागिणी अचानक घरी आली, तब्बल दहा वर्षांनी भेटल्यामुळे दोघींनी भरभरून गप्पा मारल्या गप्पा मारण्याच्या ओघात रागिणीने संपूर्ण घर फिरून मोनिका यांच्याकडून इत्यंभूत माहिती काढून घेतली, मार्केटिंग कंपनीत काम करत असल्याचे सांगून मोनिका यांना काही खोटे दागिने विनामोबदला दिले.पुन्हा आठ दिवसानंतर सायंकाळी रागिणी आपल्या पतीसह मोनिका यांच्या घरी आली.मोनिका व त्यांचे पती सुयोग पेठवडगाव येथे कामानिमित्त गेले होते तर मोनिका यांच्या सासु पिठाच्या गिरणीत काम करत होत्या.सासरे घरीच होते.ही संधी साधत सोबतच्या छोट्या बाळाला दूध पाजायचे आहे असे सांगत रागिणीने आतल्या खोलीत जाऊन कडी घातली.आतील तिजोरी उघडून ड्रॉवर मधील दागिने घेतले.पुन्हा कडी काढून काही न घडल्यासारखा आव आणत गप्पा मारल्या आणि निघून गेली.दोन दिवसांनी मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने दागिने घेण्यासाठी मोनिका गेल्या असता दागिने नसल्याचे लक्षात आले.शोधाशोध करूनही दागिने न मिळाल्याने त्यांनी वडगांव पोलिसात फिर्याद दिली.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आठ दिवसाच्या आत रागिणीला ताब्यात घेतले. सुरवातीला आढेवेढे घेणाऱ्या रागिणीला पोलिसी खाक्या दाखवताच तिने दागिने चोरल्याची कबुली दिली.तिच्याकडून गंठण, मंगळसूत्र ,नेकलेस, रिंगा व पैंजण असे सात तोळे वजनाचे सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. हा गुन्हा पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक गिरीश शिंदे, पोलीस हवालदार जितेंद्र पाटील, इंद्रजीत शिंदे, प्रमोद चव्हाण, मिलींद टेळी, अंजना चव्हाण, धनश्री पाटील यांचे पथकाने उघडकीस आणला.
Latest Marathi News कोल्हापूर : मैत्रीण म्हणून आली अन् दागिन्यांवर डल्ला मारून गेली, खोचीतील घटना Brought to You By : Bharat Live News Media.