सांगली : भाजपने घेतला खासदार संजयकाकांशी पंगा?

विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगलीतील खानापूर तालुक्यातील पळशी येथे ‘नमो केसरी’ या नावाने भव्य राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा होत आहेत. या कुस्ती स्पर्धा सांगली शहर जिल्हा तालिम संघाच्या मान्यतेने आमदार गोपिचंद पडळकर आणि भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने आयोजित करण्यात येत आहेत. मात्र याबाबत आज (दि.२१) गावागावात लावण्यात आलेल्या आणि वाटण्यात येणाऱ्या पोस्टर्समधून खासदार संजयकाका पाटील … The post सांगली : भाजपने घेतला खासदार संजयकाकांशी पंगा? appeared first on पुढारी.

सांगली : भाजपने घेतला खासदार संजयकाकांशी पंगा?

विटा; Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगलीतील खानापूर तालुक्यातील पळशी येथे ‘नमो केसरी’ या नावाने भव्य राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा होत आहेत. या कुस्ती स्पर्धा सांगली शहर जिल्हा तालिम संघाच्या मान्यतेने आमदार गोपिचंद पडळकर आणि भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने आयोजित करण्यात येत आहेत. मात्र याबाबत आज (दि.२१) गावागावात लावण्यात आलेल्या आणि वाटण्यात येणाऱ्या पोस्टर्समधून खासदार संजयकाका पाटील यांचा फोटो गायब आहे.
संबंधित पोस्टरवर पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे, निशिकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, सुहास पाटील, अनिल पाटील आदींच्या नावासह अगदी संयोजक पैलवान सत्यजित पाटील यांचा सुद्धा फोटो आहे. मात्र जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय पाटील यांचे नाव आणि फोटो नेत्यांच्या फोटोमधून गायब झाला आहे. ही कशाची सुरुवात आहे? सांगलीची खासदारकी जिंकायची असेल तर संजयकाकांशी उघड उघड पंगा घेतल्याशिवाय विजयाचा दंगा आपल्याला करता येणार नाही. हे लक्षात घेऊन भाजपने संजयकाकांना बाजूला करायला सुरुवात तर केली नाही ना? अशी जोरदार चर्चा खानापूर तालुक्यात सुरू आहे.
हेही वाचा :

Ajit Pawar : मुंबईत या, फाईलवर कोणाची सही आहे, ते दाखवतो : अजित पवार 
Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटूंबियासह घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन
Nashik I शिंदे गट म्हणजे रामायणात वध झालेली पात्रे – खासदार संजय राऊत

Latest Marathi News सांगली : भाजपने घेतला खासदार संजयकाकांशी पंगा? Brought to You By : Bharat Live News Media.