नंदुरबार: लक्ष्मी खेडा येथे ५ हजार लाभार्थ्यांना १० हजार गायींचे वाटप
नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांच्या हस्ते सुमारे 5 हजार लाभार्थीना 10 हजार गायी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील हा पहिला भव्य दुधाळ गायी वितरण मेळावा तालुक्यातील केसर पाडा गावानजीक लक्ष्मी खेडा येथे पार पडला. Nandurbar News
संसद रत्न खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित, माजी आमदार शरद गावित, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक च्या व्यवस्थापकीय संचालिका लिना बनसोड (भा.प्र.से.), सुमूल डेअरी चेअरमन मानसिंगभाई पटेल, व्यवस्थापकीय संचालक अरुणभाई एच.पुरोहित, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, सहायक प्रकल्प अधिकारी किरण मोरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ अशोक वळवी, जिल्हा लीड बॅकेचे सचिन गांगुर्डे, शबरी वित्त चे नंदुरबार शाखाधिकारी हितेश पाटील याप्रसंगी उपस्थित होते. Nandurbar News
योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबारतालुका – ५००० लाभार्थी, धुळे जिल्ह्यातील सक्री तालुका-२००० लाभार्थी, नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुका- ३००० लाभार्थी, पालघर जिल्ह्यातील जवहार, वाडा, मोखडा, विक्रमगड, डहाणू व तलासरी २५०० लाभार्थी यांचा समावेश आहे. अशाप्रकारे प्रकल्प अंतर्गत एकूण १२५०० लाभार्थ्यांना २५००० दुधाळ गायींचे वाटप केले जाईल. त्याचा पहिला भव्य मेळावा आज दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी नंदुरबार तालुक्यातील केसर पाडा गावा नजीक लक्ष्मी खेडा येथे घेण्यात आला. या मेळाव्यात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ कुमुदिनी गावित, संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते पाच गायींचे पूजन करून या वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. प्रकल्पा अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील १९५ गावातील ५००० प्रती लाभार्थी २ गायी प्रमाणे एकूण १०००० गायी देण्यात येणार आहेत; अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली.
हेही वाचा
नाशिक : नंदूरबार बस स्थानकावर चोरी; महिलेची बॅग कापून सव्वा तोळ्यासह रोख रक्कम लंपास
नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु
काळजी घ्या: राज्यात दीड महिन्यांत उष्माघाताचे 357 संशयित रुग्ण, सर्वाधिक रुग्ण नंदूरबारमध्ये
The post नंदुरबार: लक्ष्मी खेडा येथे ५ हजार लाभार्थ्यांना १० हजार गायींचे वाटप appeared first on पुढारी.
नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांच्या हस्ते सुमारे 5 हजार लाभार्थीना 10 हजार गायी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील हा पहिला भव्य दुधाळ गायी वितरण मेळावा तालुक्यातील केसर पाडा गावानजीक लक्ष्मी खेडा येथे पार पडला. Nandurbar News …
The post नंदुरबार: लक्ष्मी खेडा येथे ५ हजार लाभार्थ्यांना १० हजार गायींचे वाटप appeared first on पुढारी.