द्राक्ष्यांचे आरोग्यासाठी अनेक लाभ
नवी दिल्ली ः सध्या बाजारात द्राक्षे दिसू लागले आहेत. हिरवी द्राक्षे असोत किंवा काळी, सर्वांनाच ती आवडत असतात. द्राक्षे केवळ गोड चवीमुळेच नव्हे तर आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. द्राक्ष्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरतात. ( Health of Grapes )
संबंधित बातम्या
सर्वात महागडी द्राक्षे रुबी रोमन
Bad Cholesterol : खराब कोलेस्टेरॉल हटवण्यासाठी काळी द्राक्षे गुणकारी
Babar Azam : कोल्ह्याला द्राक्षे आंबट..!
द्राक्ष्यांमध्ये अँटिऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे द्राक्ष्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच शरीरातून विषारी, घातक घटक बाहेर काढण्यासाठीही द्राक्ष्यांचे सेवन उपयुक्त ठरते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही द्राक्षे मदत करू शकतात.
द्राक्ष्यांचे सेवन हाडे मजबूत करण्यासाठीही गुणकारी ठरते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही द्राक्षे लाभदायक ठरतात. त्वचेला तजेलदारपणा लाभावा, यासाठीही द्राक्षे उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कर्करोगासारखे आजार दूर ठेवण्यासाठीही द्राक्ष्यांचे सेवन सहायक होते. ( Health of Grapes )
Latest Marathi News द्राक्ष्यांचे आरोग्यासाठी अनेक लाभ Brought to You By : Bharat Live News Media.