ब्रेकिंग : अफगाणिस्तानमध्ये विमान अपघात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात रविवारी भारतीय प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.स्थानिक मीडियानुसार, हे विमान रशियाच्या मॉस्कोला जात होते. यादरम्यान तो बदखशानच्या डोंगराळ भागात रडारवरून अचानक गायब झाल्याचे वृत्त आहे.
( Indian Plane Crashes In Afghanistan )
बदख्शानच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख जबिहुल्ला अमीरी यांनी सांगितले की, प्रवासी विमान बदख्शान प्रांतातील कुरान-मुंजन आणि झेबाक जिल्ह्यांजवळील तोफखाना पर्वतांमध्ये कोसळले. तपासासाठी एक पथक या भागात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ही दुर्घटना झाली आहे. ( Indian Plane Crashes In Afghanistan )
( बातमी अपडेट हाेत आहे )
Latest Marathi News ब्रेकिंग : अफगाणिस्तानमध्ये विमान अपघात Brought to You By : Bharat Live News Media.
