नादुरुस्त दुभाजकांमुळे अपघात : हडपसरमध्ये सोलापूर रस्त्यावरील चित्र

हडपसर : पुढारी वृत्तसेवा : अशास्त्रीय रचना व लक्षात न येणार्‍या दुभाजकांमुळे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी वारंवार अपघात होत आहेत. तुटलेले दुभाजक, पुलावरील संरक्षक कठड्याच्या व दुभाजकांच्या सुरुवातीला असलेला रिफ्लेक्टरचा अभावामुळे हे अपघात होत असल्याचे दिसत आहे. फातिमानगर ते मगरपट्टा चौक या सुमारे तीन-चार किलोमीटर अंतरात बीआरटी मार्ग आहे. या मार्गातील प्रत्येक चौकात सुरू होणार्‍या … The post नादुरुस्त दुभाजकांमुळे अपघात : हडपसरमध्ये सोलापूर रस्त्यावरील चित्र appeared first on पुढारी.

नादुरुस्त दुभाजकांमुळे अपघात : हडपसरमध्ये सोलापूर रस्त्यावरील चित्र

हडपसर : Bharat Live News Media वृत्तसेवा : अशास्त्रीय रचना व लक्षात न येणार्‍या दुभाजकांमुळे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी वारंवार अपघात होत आहेत. तुटलेले दुभाजक, पुलावरील संरक्षक कठड्याच्या व दुभाजकांच्या सुरुवातीला असलेला रिफ्लेक्टरचा अभावामुळे हे अपघात होत असल्याचे दिसत आहे. फातिमानगर ते मगरपट्टा चौक या सुमारे तीन-चार किलोमीटर अंतरात बीआरटी मार्ग आहे. या मार्गातील प्रत्येक चौकात सुरू होणार्‍या दुभाजकाला रिफ्लेक्टर बसवलेले नाहीत. तसेच, बीआरटी बसथांब्यावरील छोट्या व मोठ्या दुभाजकांनाही रिफ्लेक्टर व रंगकाम नाही. त्यामुळे हे दुभाजक वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत.
दुभाजक लक्षात न आल्याने रात्रीच्या वेळी अनेक छोटी- मोठी वाहने त्याला धडकून अपघात होत आहेत. या अपघातांमुळे सर्व दुभाजकांची मोडतोड झाली आहे. वेळोवेळी त्याची दुरुस्ती होत नसल्याने अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मगरपट्टा चौकातील तसेच हडपसर गावातील उड्डाणपुलाच्या तीनही बाजूच्या सुरुवातीला रस्ता लक्षात येईल, असे रिफ्लेक्टर नाहीत. पुलावर प्रवेश करताना वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने डाव्या बाजूने वाहने थेट संरक्षण कठड्याला धडकून अपघात होत असतात.
प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बापू हाके यांनी वारंवार महापालिका व पोलिस प्रशासनाला ही बाबत वारंवार लक्षात आणून दिली आहे. मात्र, कार्यवाही होत नसल्याने हाके यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रिफ्लेक्टर व दुभाजकाच्या देखभाल दुरुस्तीअभावी वाहनांचे अपघात होत असल्याचे लक्षात आले आहे. महापालिकेकडे
रिफ्लेक्टर तसेच दुभाजकांची दुरुस्ती व रंगकाम करण्यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जाईल.
– अर्जुन बोत्रे, पोलिस निरीक्षक, हडपसर वाहतूक विभाग.
हडपसर 15 नंबर ते फातिमानगर उड्डाणपूल अखंड झाला पाहिजे, तरच अपघात नियंत्रणात येऊ शकेल. दुभाजकला रिफ्लेक्टर बसवावा, वाहनांचा वेग मर्यादित पाहिजे.
– बाळासाहेब विभुते, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

मनोरंजन : रुपेरी पडद्यावरचे रामायण
कोल्हापूर : बलात्कारानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून लुबाडले
MPSC : औषध निरीक्षकपदासाठीची अट सरकारकडून रद्द

Latest Marathi News नादुरुस्त दुभाजकांमुळे अपघात : हडपसरमध्ये सोलापूर रस्त्यावरील चित्र Brought to You By : Bharat Live News Media.