बेळगावच्या पंडित शर्मांनी काढला प्रतिष्ठापना मुहूर्त

बेळगाव : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरविण्याचा मान बेळगावला मिळाला आहे. बेळगावातील पंडित विजयेंद्र शर्मा यांनी हा मुहूर्त निश्चित केला आहे.
5 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या भूमिपूजनाचाही मुहूर्त पंडित शर्मा यांनी काढला होता. ते बेळगावमधील विद्याविहार विद्यालयाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल 2022 मध्ये स्वामी गोविंदगिरी देव महाराज यांनी पंडित शर्मा यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी जानेवारीतील मुहूर्त सुचवण्यास त्यांना सांगितले. त्यांनी जानेवारीतील 18, 22 व 25 असे तीन तारखांचे मुहूर्त त्यांना सुचविले होते. त्यानुसार 18 जानेवारी रोजी मंदिरात मूर्ती प्रवेश करण्यात आला. 22 रोजी अभिजित मुहूर्त, मेष लग्न निश्चित करण्यात आला.
हेही वाचा :
अयोध्येत गुंजणार सूर… मुस्लिम कुटुंबाने बनवली २१.६ फूटाची बासरी
राम मंदिराला ४०० किलोचे कुलूप अलीगढहून अयोध्येत दाखल
जय श्री राम! नागपूरमधील विद्यार्थी राम भजनात दंग, नृत्याचा व्हिडिओ व्हायरल
The post बेळगावच्या पंडित शर्मांनी काढला प्रतिष्ठापना मुहूर्त appeared first on Bharat Live News Media.
