ब्रह्मदेव आले तरी सर्वांसाठी घरे बांधू शकणार नाहीत : अजित पवार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या आहे. त्यामुळे एक किंवा दोन अपत्यावर थांबा. लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास ब्रह्मदेव आले तरी सर्वांना घरे बांधून देऊ शकणार नाहीत, अशी मिश्कील टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरी आणि आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारलेल्या प्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी आयोजित संगणकीय सोडत … The post ब्रह्मदेव आले तरी सर्वांसाठी घरे बांधू शकणार नाहीत : अजित पवार appeared first on पुढारी.

ब्रह्मदेव आले तरी सर्वांसाठी घरे बांधू शकणार नाहीत : अजित पवार

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या आहे. त्यामुळे एक किंवा दोन अपत्यावर थांबा. लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास ब्रह्मदेव आले तरी सर्वांना घरे बांधून देऊ शकणार नाहीत, अशी मिश्कील टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरी आणि आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारलेल्या प्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसंख्यावाढीला आवर घालणे ही सरकारबरोबर नागरिकांचीही जबाबदारी आहे. मी 33 वर्षांपूर्वी खासदार झालो तेव्हाची पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या आणि सध्याची लोकसंख्या यांची तुलना केली, तर लोकसंख्येत मोठी वाढ झालेली दिसते, असे त्यांनी सांगितले. घरांच्या सोडतीसाठी कोणी पैशांची लुबाडणूक करून नंबर काढून देतो, असे सांगत असेल, तर अशा व्यक्तींबाबत तक्रार करा. त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. अशा शहाण्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
…तर चौफुल्याला जाऊ नका
घरांच्या सोडतीत नंबर लागला नाही, तर त्यामुळे नाराज होणे समजू शकतो. मात्र, निराश होऊ नका. घर मिळाले नाही म्हणून पैसे उधळत बसू नका. चौफुला, टेंभुर्णीला जाऊ नका, असा उल्लेख पवार यांनी करताच सभागृहात हशा पिकला.
हेही वाचा

ए. एस. ट्रेडर्सचा फरार संचालक पोलिसांत
प्रतीक्षा संपली; रामलल्लाची उद्या प्राणप्रतिष्ठापना
राम मंदिरासाठी दिल्लीतील विद्यापिठे बंद राहणार

Latest Marathi News ब्रह्मदेव आले तरी सर्वांसाठी घरे बांधू शकणार नाहीत : अजित पवार Brought to You By : Bharat Live News Media.