अंतिम सामन्यात कस खेळायच, जडेजा म्हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक सामन्याच्या अंतिम सामन्यापूर्वी प्रचंड वातावरण निर्मिती होते. याचा निश्चितच खेळाडूवर दबाब असतो मात्र, एकदा सामना सुरू झाला की तो, सर्वसाधारण सामन्या सारखाच होते. अंतिम सामन्यालाही आम्ही असेच सामोरे जाणार आहोत असे भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितले. (IND vs AUS WC Final) यावेळी जडेजा म्हणाला यापूर्वी विश्वचषक … The post अंतिम सामन्यात कस खेळायच, जडेजा म्हणाला… appeared first on पुढारी.

अंतिम सामन्यात कस खेळायच, जडेजा म्हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक सामन्याच्या अंतिम सामन्यापूर्वी प्रचंड वातावरण निर्मिती होते. याचा निश्चितच खेळाडूवर दबाब असतो मात्र, एकदा सामना सुरू झाला की तो, सर्वसाधारण सामन्या सारखाच होते. अंतिम सामन्यालाही आम्ही असेच सामोरे जाणार आहोत असे भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितले. (IND vs AUS WC Final)
यावेळी जडेजा म्हणाला यापूर्वी विश्वचषक जिंकलेल्या खेळाडूंनी आमच्याशी ड्रेसिंगरूमध्ये संवाद साधला. आजचा सामना अत्यंत शांतपणे खेळावा अतिरिक्त दबाव घेवू नये. असा दिला त्यांनी दिला आहे. आम्हीही त्या प्रमाणेच अंतिम सामन्याला सामोरे जाणार आहोत.
ऑस्‍ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामना आज (दि.१९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे. भारत आणि ऑस्‍ट्रेलियात यांच्‍यात होणार्‍या या महामुकाबल्‍याचा थरार अनुभवण्‍यासाठी देशातील क्रिकेटप्रेमी सज्‍ज झाला आहे. ऑस्‍ट्रेलियाने टॉस जिंकला असून, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. (IND vs AUS WC Final)
फिरकीपटूंना मदत करणारी खेळपट्टी
नरेंद्र मोदी स्टेडियमची विकेट फिरकी गोलंदाजीला मदत करण्यासाठी ओळखली जाते. आजच्‍या सामन्‍याच्‍या खेळपट्टीवर फिरकीपटूंना साथ मिळेल. प्रथम चेंडू स्‍विंग होईल. जसा खेळ चालेले तसे खेळपट्टी फिरकीपटूंना साथ मिळेल, असा अंदाज माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्‍त्री आणि हरभजन सिंग यांनी व्‍यक्‍त केला आहे. तसेच प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने २८० ते ३०० धावा केल्‍यास या लक्ष्‍याचे पाठलाग करणे आव्‍हानात्‍मक असेल, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

All #TeamIndia supporters across the globe currently! 😊
Let’s DO This! 👏 👏
Go well, Team India! 🇮🇳
Follow the match ▶️ https://t.co/uVJ2k8mWSt #CWC23 | #MenInBlue | #INDvAUS | #Final pic.twitter.com/if7rOMkISk
— BCCI (@BCCI) November 19, 2023

हेही वाचा :

IND VS AUS Final World Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमवर ‘सूर्यकिरण’ एअर शोचा थरार, पाहा व्हिडिओ
ऑल द बेस्‍ट टीम इंडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
INDvsAUSfinal : टीम इंडिया स्टेडियममध्ये दाखल; चाहत्यांची मोठी गर्दी

The post अंतिम सामन्यात कस खेळायच, जडेजा म्हणाला… appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक सामन्याच्या अंतिम सामन्यापूर्वी प्रचंड वातावरण निर्मिती होते. याचा निश्चितच खेळाडूवर दबाब असतो मात्र, एकदा सामना सुरू झाला की तो, सर्वसाधारण सामन्या सारखाच होते. अंतिम सामन्यालाही आम्ही असेच सामोरे जाणार आहोत असे भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितले. (IND vs AUS WC Final) यावेळी जडेजा म्हणाला यापूर्वी विश्वचषक …

The post अंतिम सामन्यात कस खेळायच, जडेजा म्हणाला… appeared first on पुढारी.

Go to Source