Pune Crime News : फरपटत नेल्याने पोलिस हवालदार जखमी

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी रात्रगस्त घालत असताना एका संशयित रिक्षाची चौकशी करीत होते. या वेळी रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जात असताना पोलिस हवालदाराला फरपटत नेले. त्यामुळे पोलिस हवालदार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) घडली. शंकर तानाजी साळुंके असे जखमी पोलिस हवालदाराचे नाव आहे. शिक्रापूरचे पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख व … The post Pune Crime News : फरपटत नेल्याने पोलिस हवालदार जखमी appeared first on पुढारी.

Pune Crime News : फरपटत नेल्याने पोलिस हवालदार जखमी

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी रात्रगस्त घालत असताना एका संशयित रिक्षाची चौकशी करीत होते. या वेळी रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जात असताना पोलिस हवालदाराला फरपटत नेले. त्यामुळे पोलिस हवालदार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) घडली. शंकर तानाजी साळुंके असे जखमी पोलिस हवालदाराचे नाव आहे.
शिक्रापूरचे पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख व पोलिस हवालदार शंकर साळुंके हे रात्रगस्त घालत होते. रात्री अडीचच्या सुमारास शिक्रापूर-तळेगाव रस्त्यावरील ओढ्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा (एमएच 12 एसके 8293) संशयास्पद अवस्थेत त्यांनी दिसली. या वेळी साळुंके यांनी रिक्षाजवळ जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालक पळून जाऊ लागला.
दरम्यान, शंकर साळुंके यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिस हवालदार साळुंके यांना पुढे फरपटत गेले.
याबाबत शंकर तानाजी साळुंके (वय 44, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी उमेश सागर अडागळे (वय 32, रा. टाकळी भीमा, ता. शिरूर) या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
हेही वाचा
ऑल द बेस्‍ट टीम इंडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
गुजरातच्या उंबरगाव औद्योगिक क्षेत्रातील ३ कंपन्या आगीत जळून खाक
Pune News : बंधार्‍यावरून प्रवास ठरतोय धोकादायक
The post Pune Crime News : फरपटत नेल्याने पोलिस हवालदार जखमी appeared first on पुढारी.

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी रात्रगस्त घालत असताना एका संशयित रिक्षाची चौकशी करीत होते. या वेळी रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जात असताना पोलिस हवालदाराला फरपटत नेले. त्यामुळे पोलिस हवालदार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) घडली. शंकर तानाजी साळुंके असे जखमी पोलिस हवालदाराचे नाव आहे. शिक्रापूरचे पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख व …

The post Pune Crime News : फरपटत नेल्याने पोलिस हवालदार जखमी appeared first on पुढारी.

Go to Source