जळगाव : पारोळामधील म्हसवे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; ९ सिलेंडरसह दोन वाहने जळून खाक

जळगांव; Bharat Live News Media वृत्तसेवा : पारोळा तालुक्यात जवळील म्हसवे येथे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोट मध्ये दोन ओन्ली वन गॅस सिलेंडरचा स्फोट झालेला आहे तर त्या ठिकाणी एकूण 21 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे या अपघातात दोन लाख पन्नास हजार आठशे रुपयांच्या मुद्देमाल मिळाला आहे याप्रकरणी पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारोळा पोलिसात मोठा भाऊ या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पारोळा तालुक्यातील म्हसवे या गावाजवळ 19 रोजी रात्री मोठा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या ठिकाणी झालेल्या स्फोटामुळे दोन किलोमीटर वरून आगीचे दृश्य दिसत होते सिलेंडरच्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती तसेच या ठिकाणी अवैधरीत्या गॅस भरण्यात येणाऱ्या दोघी ओमनी गाड्या जळून खाक झाल्या होत्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला
स्फोटामध्ये नऊ सिलेंडरचा स्फोट झालेला असून घटनास्थळी 12 सिलेंडर सुस्थितीत मिळालेले आहेत त्यामध्ये अनेक सिलेंडर हे भरलेले होते असे एकूण 21 सिलेंडर घटनास्थळी पुरवठा निरीक्षक व पोलिसांना मिळालेले आहेत घटनास्थळी दोन लाख पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जळालेल्या गाड्यांसह जप्त केलेला आहे.
याप्रकरणी पुरवठा निरीक्षक विश्वजीत सिंह विजय सिंह गिरासे यांनी दिलेला फिर्यादीवरून पारोळा पोलिसात मोठा भाऊ उर्फ खंडेराव रामराव पाटील तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र मोठा भाऊ यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सुरू होता त्यांच्यावर त्याच्यावर कोणाचा आशीर्वाद होता पोलीस याआधी त्यांच्यावर कारवाई का केली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
Latest Marathi News जळगाव : पारोळामधील म्हसवे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; ९ सिलेंडरसह दोन वाहने जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.
