कोल्हापूर : घोटवडे मतदान केंद्राजवळ करणीचे प्रकार
राशिवडे ; पुढारी वृतसेवा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानास सकाळी सुरूवात झाली. घोटवडे ता. राधानगरी येथील मतदान केंद्राजवळ अघोरी करणी करण्याचे प्रकार अज्ञाताने केल्याचे समोर आले. नारळ, बाहुली चप्पल आणि हळदी कुंकुही या ठिकाणी आढळून आले. संगणकाच्या युगामध्ये मानव चंद्रावर पोहोचला असताना करणीचे प्रकार वैज्ञानिक युगातही असे प्रकार घडत असल्याने या विषयी उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान आज दुपारी दु.१२ पर्यत ४८ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी तुरळक गर्दी होती. परंतु १० नंतर मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली. राधानगरी, करवीर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यातील घोटवडे, गुडाळ, राशिवडे बु,कंथेवाडी,येळवडे तर करवीरमधील हसुर दु, सडोली खा, कोथळी, बेले, म्हाळुंगे या मतदानकेंद्रावर पन्नास टक्के मतदान झाले. एका मतदान केंद्रावर तीन ते चार टेबल असल्याने मतदान प्रक्रीया गतीने होत होती.
हेही वाचा :
WC Final India vs Australia live : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
ऑल द बेस्ट टीम इंडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
International Men’s day 2023 | पुरुषांमध्ये वाढतंय नैराश्य! जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय
The post कोल्हापूर : घोटवडे मतदान केंद्राजवळ करणीचे प्रकार appeared first on पुढारी.
राशिवडे ; पुढारी वृतसेवा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानास सकाळी सुरूवात झाली. घोटवडे ता. राधानगरी येथील मतदान केंद्राजवळ अघोरी करणी करण्याचे प्रकार अज्ञाताने केल्याचे समोर आले. नारळ, बाहुली चप्पल आणि हळदी कुंकुही या ठिकाणी आढळून आले. संगणकाच्या युगामध्ये मानव चंद्रावर पोहोचला असताना करणीचे प्रकार वैज्ञानिक युगातही असे प्रकार घडत असल्याने या विषयी उलट-सुलट प्रतिक्रिया …
The post कोल्हापूर : घोटवडे मतदान केंद्राजवळ करणीचे प्रकार appeared first on पुढारी.