
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओप्रकरणातील मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी १० नोव्हेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी सायबर गुन्ह्यांमध्ये सराईत आहे. ( Creator of deepfake video of actor Rashmika Mandanna arrested )
६ नोव्हेंबर रोजी रश्मिका मंदानाचा सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती एका लिफ्टमध्ये दिसत होती. डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “माझा डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याबद्दल बोलताना मला खूप वाईट वाटते. AI केवळ माझ्यासाठीच नाही तर या तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे धोक्यात असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे.” या प्रकरणी रश्मिकाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. आता मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ( Creator of deepfake video of actor Rashmika Mandanna arrested )
Creator of deepfake video of actor Rashmika Mandanna arrested, says Delhi Police
— Press Trust of India (@PTI_News) January 20, 2024
रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ व्हिडिओमध्ये हुबेहुब रश्मिकासारखी दिसणारी मुलगी लिफ्टमध्ये चढताना दिसत आहे. ही मुलगी दुसरीच असली तरी. काही काळानंतर हे स्पष्ट झाले की हा व्हिडिओमधील तरुणी मंदाना नसून झारा पटेल आहे.
हेही वाचा :
Vijay Devarakonda-Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा साखरपुडा करणार?
Rashmika Mandanna in ‘Animal’: ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदानाने ‘Animal’ मधून परिणीती चोप्राचा केला पत्ता कट!
Latest Marathi News रश्मिका मंदानाच्या ‘डीपफेक’ व्हिडिओ प्रकरणातील सूत्रधारास अटक Brought to You By : Bharat Live News Media.
