हरियाणात ‘आप’ला मोठा धक्का! माजी खासदार डॉ. अशोक तंवर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी खासदार डॉ. अशोक तंवर यांनी आज (दि. २०) भाजपमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वीच आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसच्या युतीवरून त्यांनी राजीनामा दिला होता. आम आदमी पक्षाच्या हरियाणा राज्य निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यापूर्वी ते कॉंग्रेसमध्येही होते. अशोक तंवर यांनी दोन दिवसांपूर्वी … The post हरियाणात ‘आप’ला मोठा धक्का! माजी खासदार डॉ. अशोक तंवर यांचा भाजपमध्ये प्रवेश appeared first on पुढारी.
हरियाणात ‘आप’ला मोठा धक्का! माजी खासदार डॉ. अशोक तंवर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी खासदार डॉ. अशोक तंवर यांनी आज (दि. २०) भाजपमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वीच आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसच्या युतीवरून त्यांनी राजीनामा दिला होता. आम आदमी पक्षाच्या हरियाणा राज्य निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यापूर्वी ते कॉंग्रेसमध्येही होते.
अशोक तंवर यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा होत्या. आज दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत अशोक तंवर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष नायब सैनी यांनी अशोक तंवर यांचे पक्षात स्वागत केले. अशोक तंवर यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसपासुन सुरु झाली. काँग्रेसमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी आपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांनी ‘आप’चा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, काही काळ ते तृणमूल काँग्रेसमध्येही होते.
काँग्रेसमध्ये सांभाळल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
डॉ. अशोक तंवर यांनी काँग्रेसमध्ये असताना हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अशा महत्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळली आहे. राहुल गांधींचे जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जात होते. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भुपेंद्रसिंह हुड्डा यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

Latest Marathi News हरियाणात ‘आप’ला मोठा धक्का! माजी खासदार डॉ. अशोक तंवर यांचा भाजपमध्ये प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.